Graphic designing information in Marathi.

ग्राफिक डिझायनिंग म्हणजे काय मराठी माहिती.

Graphic design meaning and all information in Marathi।ग्राफिक डिझायनिंग काय आहे
ग्राफिक डिझायनिंग

ग्राफिक डिझायनिंग.

"ग्राफिक डिझायनिंग म्हणजे एखाद्या कलाकृतीमधून दृश्य स्वरूपात एखादा संदेश देणे किंवा फोटो,स्केच,कलाकृती,हे दृश्य स्वरूपात मांडणे होय." 
"Graphic designing is the process of conveying a message from an artwork, or presenting a photo, sketch, artwork, in visual form."

 

Graphic design करणारा हा Graphic Designer असतो. ग्राफिक डिझाईनर होण्यासाठी Graphic designer चा कोर्स करणे आवश्यक असते.ग्राफिक डिझायनर म्हणून करियर खूप साधा आणि सोपा आहे. दहावी बारावीनंतर हा कोर्स करून तुम्ही हमखास नोकरी किंवा व्यवसाय करू शकता.

ग्राफिक डिझायनिंग कोर्स कोणासाठी?

ज्यांना वाचन(Reading),लेखन(Writing), स्केचिंग (sketching) ची photography,व्हिडिओ शूटिंग(Video Shooting) करण्याची तुम्हाला आवड असेल तर हा कोर्स तुमच्यासाठी आहेच आहे. कारण ग्राफिक डिझायनिंग यासाठी लागणारा कॅमेरा नेहमीच तुमच्या हातात असतो. 

तुम्हाला  पेंटिंग मध्ये तुम्हाला इंट्रेस्ट असेल इंटरनेट ची आवड असेल तर तुमच्यासाठीच ग्राफिक डिझायनिंग कोर्स तुमच्यासाठी आहे. थोडक्यात कला आणि तंत्रज्ञानाची आवड असणाऱ्यांसाठी हा कोर्स आहे.

ग्राफिक डिझाईनर होण्यासाठी आवश्यक गोष्टी.

  • नियमित स्केचिंग।Regular sketching.
  • दररोज लिखाण।Daily writing.
  • सतत निरीक्षण करणं।Constant monitoring.
  • लक्ष देऊन ऐकने।Listen carefully.
  • गांभीर्याने विचार करने।To think seriously.
  • काल्पनिक दृष्य पाहणे।Fictional viewing.

नियमित स्केचिंग केल्याने आपला सराव होऊन आपल्याला आपल्या कामात सुधारणा करण्यासाठी वाव मिळतो.तसेच आपल्याला छोट्याछोट्या काही गोष्टी माहिती होतात.नियमित स्केचिंग केल्याने आपल्यातील काही चुका टाळता येतात. 

दररोज लिखाण करण्याची सवय असणार्‍या व्यक्तिला विचार करण्यास चालना मिळते तसेच हातांचा व बोटांचा सराव होतो,अक्षरात सुधारणा होते.ज्ञानात भर पडत राहते.नवीन कल्पना सुचतात.  

निरीक्षण करणे म्हणजे शिकणे होय,ज्याचे निरीक्षण सूक्ष्म असेल त्याला वेगवेगळ्या कल्पना सुचत असतात.निरीक्षण केल्याने आपल्याला आपल्यातील चुका समजतात,तसेच त्या गोष्टीची संपूर्ण माहिती मिळते. ऐकून आपण बरेच काही ज्ञान ग्रहण करतो ,त्यामुळे एका ग्राफिक डिझायनर साथी ऐकणे खूप महत्वाचे आहे. 

एखादी गोष्ट पाहिल्यावर तिचे सूक्ष्म निरीक्षण करून त्याविषयी काल्पनिक चित्र तयार करणे आणि टीआर आपल्या दृश्य स्वरुपात डिझाईन करणे त्यात काल्पनिक काही गोष्टी अॅड करणे म्हणजे आपल्याला आपल्या कामात प्रभावीपने डिझायनिग करण्यात यश मिळेल. 

ग्राफिक डिझाईन अगोदर डोक्यात बंद आणि ते फक्त तुम्हालाच दिसत असतात जगाला दिसण्यासाठी तुम्हाला ते कॉम्प्युटरवर बनवावा लागतो म्हणजे लक्षात घ्या तुमच्या डोक्यातील कल्पना दृश्य रुपात आणायची म्हणजेच ग्राफिक डिझाईन 

ग्राफिक डिझाईन शिकण्यासाठी आवश्यक गोष्टी.

  • पेन आणि कागद.
  • कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप.
  • स्मार्टफोन.
  • internet.

इथूनच ग्राफिक डिझाईन ची सुरुवात पेन आणि कागद या दोन गोष्टीनेच होते.दररोज एक स्केच करण्याची सवय लावून घेणे. ग्राफिक डिझायनर होण्यासाठी खूप महत्त्वाचे स्केचिंग  एक महत्त्वाचा  भाग आहे.अभ्यास विषय दररोज काही तरी लिहिण्यासाठी एक पेन आणि एक डायरी जवळ असायला पाहिजे . 

तुमच्याकडे तुमचं स्वता:चे Computer , Laptop, Smartphone असणे आवश्यक असून इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक आहे. 

ग्राफिक डिझाईनसाठी लागणारी सॉफ्टवेअर .

ग्राफिक साठी लागणाऱ्या सॉफ्टवेअर ची लिस्ट खूप मोठी आहे पण सुरुवातीला एक आणि एक अशी किमान Vector आणि Raster दोन सॉफ्टवेअर शिकावी लागतात.कारण ग्राफिक डिझाईन मध्ये Vector आणि Raster अशी दोन वेगवेगळे मुद्दे महत्वाचे आहेत. 

  • Adobe Illustrator.
  • Affinity designer.
  • Adobe Photoshop.
  • Caneva.
  • Coral Draw.

ग्राफिक डिझाईन कोर्स विषयी माहिती. 

ग्राफिक डिझायनिंग मध्ये अनेक ठिकाणी सरकारी नोकर्‍याची संधी सुद्धा मिळते-Government Jobs In Designing Field म्हणून आजच्या काळात ग्राफिक डिझायनिंग ला खूप महत्व प्राप्त झाले आहेत,काही असे कोर्स आहेत की ते तुम्ही घरी बसून ऑनलाईन ग्राफिक डिझायनिंग Online graphic designing कोर्स करू शकता. 

  • टी शर्ट डिझाईन कोर्स-T-shirt design course.
  • वेडिंग कार्ड अल्बम कोर्स-Wedding Card Album Course.
  • फोटो इफेक्ट कोर्स -Photo effects course.
  • फोटो मिक्सिंग कोर्स-Photo mixing course.
  • ड्रॉइंग पब्लिकेशन कोर्स-Drawing Publication Course.
  • वेब डिझाईन कोर्स-Web Design Course.
  • ब्लॉग किंवा वेबसाईट बनवणे- Creating a blog or website.
  • डिजिटल मार्केटिंग कोर्स-Digital marketing course.
  • सोशल मीडिया मार्केटिंग -Social media marketing.

ग्राफिक डिझाइनरसाठी वरील वेगवेगळे कामे हे सहज उपलब्ध होतात,नोकरी मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी ग्राफिक डिझायनिंग कोर्स खूप आवश्यक आहे. काही कोर्स करून तुम्ही पार्ट टाईम काम मिळवून पैसे कमवू शकता.  

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने