PDF फाईल कशी तयार करतात?
PDF म्हणजे काय?
"PDF (पीडीएफ) एक फाईल फॉरमॅट असून त्याला Portable Document Format असे म्हटले जाते."
सध्याच्या काळात डिजिटल पद्धतीचा सर्वत्र अवलंब केला जात आहे.तुम्ही कुठे तरी किंवा केव्हा तरी नक्कीच PDF विषयी ऐकले असेल किंवा पहिले असेल.आपण पीडीएफ म्हणजे काय?PDF कशी तयार करावी? याविषयी माहिती घेऊया.
PDF File हे सर्वप्रथम Adobe या कंपनीने तयार करून वापरात आणले होते.pdf file format कोणत्याही सॉफ्टवेअर हार्डवेअर किंवा ऑपरेटिंग सिस्टम वर अवलंबून नाही.त्यामुळे कोणत्याही डिव्हाईस वर file Transfer करताना file च्या layout किंवा file च्या स्वरुपात बदल होत नाही.पीडीएफ ला सन 2008 मध्ये ISO 32000 च्या रूपात मानांकीत केले गेले.
PDF चा इतिहास काय आहे?
PDF चा इतिहास Adobe कंपनीशी संबंधित आहे.1991 मध्ये Adobe चे संस्थापक डॉ.जॉन वोर्णोक यांनी The Camelot project नावच्या कल्पनेसह पेपर टु डिजिटल क्रांति सुरू केली,डॉक्युमेंट डिजिटल स्वरुपात तयार करून त्याचे प्रिंटेबल डॉक्युमेंट तयार करणे हे लक्ष्य होते.1993 साली हे यशस्वी झाले आणि जगभरात त्याचा वापर सुरू झाला.E Book स्वरुपातील पीडीएफ फाईल आज सर्वत्र जगभर वापरण्यात येते.
Android Mobile मध्ये PDF कशी तयार करावी?
आजकाल बरेच लोक स्मार्टफोन वापरतात, pdf तयार करण्यासाठी संगणक,मोबाईल,लॅपटॉप इत्यादि साधने वापरली जातात.Android Mobile मध्ये PDF तयार करण्यासाठी Google Play Store वर वेगवेगळे Apps उपलब्ध असून यापैकी तुम्ही सुरक्षित असणारे Android App वापरू शकता. तसेच मोबाईल मध्ये पीडीएफ तयार करण्यासाठी वेबसाईट चा सुद्धा वापर करू शकता,यात तुम्हाला Android App घेण्याची गरज भासत नाही.
WPS Office मध्ये PDF File बनवणे.
जर तुम्हाला तुमच्या Android Mobile मध्ये PDF बनवायची असेल तर,WPS Office हे Android App तुम्हाला खूप फायदेशीर आहे. यात तुम्हाला वेगवेगळे फीचर्स वापरायला मिळतील.हे एक PDF converter online tool आहे.
- आपल्या मोबाईल मधील WPS Office Android App उघडा.
- खालील उजव्या कोपर्यातील + या चिन्हावर क्लिक करा.
- नंतर New word document वर क्लिक करा.त्यातील Blank Page निवडा.
- कीबोर्ड च्या सहाय्याने तुम्ही लिहू शकता,डॉक्युमेंट एडिट करू शकता त्याठिकाणी सर्व टूल्स खालील बाजूला दिलेले आहेत त्याचा वापर करून page लेआऊट वगैरे करू शकता.
- तयार केलेले डॉक्युमेंट तुम्ही Save As करून Save करा. आता फाईल कोणत्या ठिकाणी Save करायची ते ठरवा.
- आता त्या ठिकाणी PDF हा प्रकार निवडून ,फाईल ला नाव देऊन आपली फाईल save होताना दिसेल.
- Doc Scanner Android Mobile App च्या सहाय्याने PDF फाईल तयार करणे
- Doc Scanner Android Mobile App च्या सहाय्याने PDF फाईल तयार करणे खूप सोपे आहे.सर्वप्रथम तुम्हाला हे app आपल्या मोबाईल मध्ये Google Play Store वरून इंस्टॉल करून घ्यावे लागेल. हे एक चांगले PDF converter online free, पीडिएफ मेकर pdf maker आहे.
- Doc Scanner हे app ओपेन करा.
- खालील उजव्या बाजूला असलेल्या फोटो चिन्हावर क्लिक करा.
- तुम्हाला ज्या Documents ची पीडीएफ तयार करायची आहे ते स्कॅन करून घ्या.
- त्यानंतर डॉक्युमेंट व्यवस्थित सेट अप करून घ्यावे.
- त्यानंतर खालील बाजूला असलेल्या Continue या वर क्लिक करा.
- चिन्हावर क्लिक करा .
- तुम्हाला तुमचे स्कॅन केलेले डॉक्युमेंट्स कसे दिसेल हे दाखवले जाईल.
- त्यानंतर तुम्हाला वाटत असेल की हे बरोबर आहे तर परत ☑ चिन्हावर क्लिक करा. आता तुमचे डॉक्युमेंट Save होताना दिसेल.
- त्यानंतर Save या चिन्हावर क्लिक करून तुम्हाला PDF हे option निवडून आपल्या File ला नाव द्यावे. त्या ठिकाणाहून तुम्ही तुमची PDF File शेअर सुद्धा करू शकता.
Doc Scan हे Android App वापरण्यास सोपे आहे.Doc Scan Android App मध्ये तुम्ही सहजपणे पीडीएफ फाईल तयार करू शकता.याव्यतिरिक्त गूगल प्ले स्टोअर वर अनेक App आहेत ते सुद्धा तुम्ही वापरू शकता,परंतु हे सर्व apps तुम्ही तुमच्या जबाबदारीवर वापरावे,शक्यतो गूगल प्ले स्टोअर वरील Apps सुरक्षित असतात.संगणकात तुम्ही MS Word मध्ये PDF File तयार करू शकता.
PDF File।पीडीएफ फाईल चे फायदे काय आहेत?
- Portable Document Format म्हणून पीडीएफ ची ओळख आहे. हे वापरण्यास खूप सोपे आहे.
- पीडीएफ फाईल तुम्ही शेअर करण्यासाठी सोपी आहे.
- PDF तुम्ही पासवर्ड टाकून फाईल सुरक्षित करू शकता.
- पीडीएफ फाईल ईमेल मध्ये जोडता येते.
- कितीही मोठे डॉक्युमेंट तुम्ही पीडीएफ-pdf मध्ये save-जतन करून ठेऊ शकता.
- PDF File ची print काढणे सोपे असते.
- PDF फाईल तुम्ही Mobile ,computer ,laptop मध्ये open करू शकता.
PDF फाईल वाचण्यासाठी किंवा Open करण्यासाठी काय करावे?
गूगल प्ले स्टोअर वर तुम्ही अनेक Best PDF Reader Apps, PDF converter Apps आहेत त्याचा वापर तुम्ही करू शकता.