कोडींग इन्फॉर्मेशन इन मराठी.
कोडिंग - Coding |
कोडींग म्हणजे काय।What is coding। Coding चे प्रकार।कोडींग शिकण्याचे फायदे मराठीत.
आजच्या तंत्रज्ञानाच्या जमान्यात सर्वकाही इतक्या वेगाने प्रगत होत आहे. त्यामुळे नवीन नवीन शोध लागत असून मानवाने तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रगती केलेली दिसते.
मोबाईल मधील वेगवेगळे नवीन बदल,इलेक्ट्रॉनिक्स वेगवेगळी गॅजेट्स आपण वापरत असताना त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे सुलभता आलेली असून, हे सर्व मानवाने विकसित केलेले आहेत. वेगवेगळ्या वेबसाईट तसेच वेगवेगळे सॉफ्टवेअर यामध्ये कोडींग चा वापर केला जातो.त्यामुळे काम करणे सहज शक्य झाले आहे.
Coding म्हणजे काय?
"संगणकाची स्वतःची विशिष्ट भाषा असते,ज्याला मशीन कोड असे म्हटले जाते. ते संगणकाला काय काम करायचे? कसे करायचे? याबाबत सांगत असते,म्हणजे संगणकाला जी भाषा समजते तिला कोडिंग असे म्हटले जाते.तिलाच प्रोग्रामिंग लँग्वेज असेही म्हणतात."
मशीन कोड हा एक संगणकाचा प्रोग्राम असून जो बायनरी भाषेत असून तो प्रोग्रामिंग भाषांचे मशीन कोड मध्ये भाषांतर करतो, जेणेकरून संगणक ती भाषा वाचू शकेल. मशीन कोड ऐवजी ते प्रोग्रामिंग भाषा (Program aging Language) HTML, CSS, JAVA इ.वापरतात.ती समजण्यास सोपी असते.जगातील जवळजवळ सर्वच वेबसाईट या कोडिंग चा वापर करून बनवण्यात आलेल्या आहेत.
कोडिंग लँग्वेज चे प्रकार.
C Language (सी लॅंग्वेज).
इसवी सन 1969 ते 1973 या कालावधीमध्ये डेनिस रिची यांनी C Programing Language (सी प्रोग्रामिंग लँग्वेज) विकसित केली असून,यात (जावा) Java, HP (एचपी) JavaScript (जावास्क्रिप्ट) आणि भाषेचे वाक्यरचना हे सर्व सी प्रोग्रामिंग लँग्वेज वर आधारित आहे.c programing language ही अतिशय चांगल्या दर्जाची प्रोग्रामिंग लैंग्वेज असून ती वेगवेगळ्या गेम,ब्राउजर आणि ऑपरेटिंग सिस्टीम विकसित करण्यासाठी उपयोगी पडते.सी प्रोग्रामिंग लँग्वेज ही अतिशय लवचिक असून विविध प्रकारच्या प्रोग्रामिंग ला सहकार्य करते.
Java Language (जावा लॅंग्वेज).
Java-जावा प्रोग्रामिंग लँग्वेज विकास नव्वदच्या दशकात मायक्रोसिस्टिम्स ने विकसित केले होते. Java Programming Language ही ॲप डेव्हलपमेंट साठी प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणून वापरली जाते. Java ही एक Programing Language असून, जी वेगवेगळे सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी वापरण्यात येते.तुम्ही जर जावा प्रोग्रामिंग लँग्वेज शिकून घेतली तर तुम्ही सुद्धा एखादे ॲप बनवू शकता.
HTML Language (एच टी एम एल लॅंग्वेज).
एस टी एम एल कोडींग भाषा ही वेबसाईट तयार करण्यासाठी सर्वात जास्त वापरली जाते. html -एस टी एम एल म्हणजे हायपर टेक्स्ट मार्कअप लँगवेज होय.
सन 1980 टीम बर्न्स यांनी या html coding Language चा शोध लावला होता. Html coding Language ही खूप महत्त्वाची आहे.सध्या जगभरात सर्वात जास्त या भाषेचा प्रोग्रामिंग साठी वापर केला जातो. HTML Tag च्या साह्याने वेगवेगळे काम करणे सोपे होते. जर आपण योग्य रित्या tag केले नाहीतर एचटीएमएल देखील कार्य करत नाही.
HTML Coding Language मध्ये अनेक लहान कोड असतात. जे एकत्रितपणे संपूर्ण कार्यक्रम तयार करण्यास मदत करतात. आपण लिहिताना फक्त सामान्य नोटपॅड वर HTML Coding Language लिहित असतो. HTML Coding Language मधील मूलभूत गोष्टी शिकून वेबसाईट सहज तयार करता येते.
CSS Language (सी एस एस लॅंग्वेज).
CSS-सीएसएस कोडींग लॅंग्वेज चा उपयोग पण वेबपेज तयार करण्यासाठी होतो.तसेच लेआउट, कलर, फॉन्ट, डिझाईन करणे, कस्टमाईज करणे इत्यादी कामे c s s द्वारे होतात.CSS Coding Language ही XML based markup language सोबत वापरू शकता.
RUBY Language.
Ruby programing language ही वेगवेगळे एप्लीकेशन डिझाईन करण्यासाठी वापरली जाते.Ruby programing language ही एक Python ची General Coding Language आहे.
Python Language.
HTML, CSS, JAVA Script मध्ये Python सगळ्यात वेगळी असून हिचा वापर डेटा सायन्स मध्ये केला जातो.
Coading Language.कसे शिकावे?
जर तुम्हाला कोडिंग मध्ये करिअर करायचे असेल तर तुम्ही इंजीनियरिंग, बीसीए BCA किंवा कॉम्प्युटर सायन्स मध्ये एमसीए-MCA पदवी इत्यादी कोडींग करण्यासाठी तुम्हाला उपयोगी ठरतील. तसेच या सोबत वेगवेगळ्या संस्था किंवा वेबसाइट या तुम्हाला कोडींग शिकण्यास मदत करतील.
कोडींग च्या जगात प्रथम तुम्हाला एच टी एम एल HTMLआणि सीएसएस CSS ही प्रोग्रामिंग लँग्वेज शिकणे आवश्यक असेल.
ज्यामध्ये केवळ मूलभूत वेबसाईट विकसित केल्या जातात, त्यानंतर जावास्क्रिप्ट, पीएसपी, पायथोन इत्यादी लैंग्वेज माहिती असणे आवश्यक असते.मोबाईल आयओएस आणि अँड्रॉइडसाठी तुम्हाला जावा किंवा koltlin,Flutter,इत्यादी भाषा शिकाव्या लागतात.
ऑनलाइन कोडींग शिकणे साठी महत्वाच्या वेबसाईट.
तुम्हाला जर कोडींग शिकण्याची आवड असेल तर, तुम्ही ऑनलाईन कोडींग सुद्धा शिकू शकता. आपण टीव्हीवर, इंटरनेटवर, मोबाईलवर इत्यादी ठिकाणी ऑनलाईन कोडींग शिकण्यासाठी जाहिराती पाहत आहोत,त्या ठिकाणी सुद्धा चांगल्या प्रकारे कोडींग शिकवण्याचा प्रयत्न केला जातो. कोडींग शिकण्यासाठी खालील वेबसाईट आहेत.
- 1.W3schools
- 2. Codecademy
- 3. Javapoint
त्यानंतर या व्यतिरिक्त युट्युब वर खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे कोडींग शिकण्यासाठी चैनल आहेत यांचा वापर करून सुद्धा आपण कोडींग शिकू शकता.
कोडींग शिकण्याचे फायदे.
कोडींग शिकण्याचे अनेक फायदे आहेत सध्याचे तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रगती पाहता कोटींचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे एकदा तुम्ही पुढे चांगले शिकलात की तुम्हाला पुढील गोष्टी करता येतील सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये कोडिंग शिकणे एक खूप मोठे कौशल्य असून ज्याला सध्या खूप मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.
वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या संस्था मध्ये कॉम्प्युटर प्रोग्राम प्रोग्रामला नोकरीच्या मोठमोठ्या संधी उपलब्ध होत आहेत.त्यामध्ये ते भरपूर प्रमाणात पैसे कमवू शकतात. कोडींग च्या मदतीने तुम्ही वेबसाईट वेगवेगळे प्रकारचे ऍप्स आणि व्हिडिओ गेम्स तयार करू शकता.
आपल्यासोबत इतरांनाही पैसे कमावण्याची संधी उपलब्ध करून देऊ शकता.कोडिंग शिकण्यासाठी एक प्रकारचा तार्किक विचार असणे गरजेचे आहे. तुम्हाला स्टेप बाय स्टेप कोडिंग शिकणे खूप फायदेशीर होईल.
कोडींग शिकण्यासाठी भारतातील महत्त्वाच्या युनिव्हर्सिटी.
मला ज्या यूनिवर्सिटी माहिती आहेत, त्याप्रमाणे माहिती खाली मी देण्याचा प्रयत्न करत आहे. या व्यतिरिक्तही काही युनिव्हर्सिटी जगभरात असू शकतात.
या व्यतिरिक्त आपण प्रत्यक्ष संबंधित अधिकृत शासकीय आस्थापने/कार्यालये मध्ये जाऊन चौकशी करून योग्य खात्री करून निर्णय आपल्या स्तरावर घेऊ शकता.