Marathi Story -वाचन मित्र-गोष्ट क्रं.5
प्रत्यक्ष अनुभव मिळणे आवश्यक!
image source-vectortoons.com |
एक राजा आपल्या कुत्र्यासोबत होडीतून प्रवास करत होता. इतरही प्रवासी त्या होडीत प्रवास करत होते. पण त्या कुत्र्याने पूर्वी कधीच होडीतून प्रवास केला नव्हता. त्यामुळे तो कुत्रा सतत अस्वस्थ होता. एखाद्या लाटेवर ते होडीने हेलकवा घेतलं की कुत्रा इकडे तिकडे उड्या मारीत असे.सतत भुंकत असे. सुरुवातीला लोकांनी दुर्लक्ष केले.परंतु नंतर सगळ्यांना त्याचा त्रास होऊ लागला.अगदी ती होडी चालवणारा नावाडी देखील खूप हैराण झाला.होडीत सतत असा गडबड गोंधळ सुरू झाला तर,काहीतरी अपघात नक्की घडू शकतो,अशी भीती त्यांना वाटायला वाटायला लागली.
त्या कुत्र्याला थोडे नियंत्रणात ठेवावे अशी विनंती राजाला केली.राजाला या गोष्टीचे गांभीर्य कळलं पण तरीही काही इलाज चालेल ना. आता तर कुत्रा आणखीच जास्त गोंधळ करू लागला. हे पाहून आणखी एक प्रवासी पुढे आला.
तो राजाला म्हणाला महाराज, तुम्ही अभय दिलं तर या कुत्र्याला मी शांत करू शकतो.पण मला एक प्रयोग करावा लागेल.
राजा म्हणाला कसला प्रयोग,
प्रवासी म्हणाला,प्रयोग अगदी सोपा आहे,पण त्यात तुमच्या लाडक्या कुत्र्याला थोडासा त्रास होईल, तो त्याला सहन करावा लागेल.
राजा म्हणाला ,हो,
पण प्रवासी म्हणाला, कुत्र्याला काही होणार नाही.महाराज तो अगदी सुरक्षित राहील. पण या थोड्या त्रासाने तो कुत्रा शांत होईल. आपण विचार करावा आणि मला सांगावं!
राजा म्हणाला ठीक आहे,हरकत नाही. पण हा कुत्रा माझा लाडका आहे हे विसरू नको. राजाची परवानगी मिळताच तो प्रवासी पुढे आला त्याने होडीतील आणखी तीन-चार प्रवाशांच्या मदतीने त्या कुत्र्याला उचलून पाण्यातच फेकून दिला. कुत्र्याच्या नाकातोंडात पाणी शिरू लागलं. त्याला श्वास घेणे देखील मुश्किल झाले. अगदी जीवाच्या आकांताने तो कुत्रा होडी कडे पोहोचला आणि त्यानं होडीचा आधार घ्यायचा प्रयत्न केला.
ते पाहून त्या हुशार प्रवाशांना स्वतःचा हात पुढे करत त्या कुत्र्याला होडीत उचलून घेतलं. कुत्रा आता ओढीत होता पण तो एकदम शांत बसला होता.त्याला देखील आश्चर्य वाटलं. राजाने याचं कारण त्या प्रवाशाला विचारलं तर
प्रवासी म्हणाला महाराज, पाण्यात पडल्यानंतर किती त्रास होऊ शकतो आणि होडीमध्ये आपण किती सुरक्षित आहोत याची जाणीव मी त्या कुत्र्याला करून दिली बाकी विशेष काहीच नाही.
तात्पर्य - प्रत्यक्ष अनुभव घेऊन वाईट परिस्थितीची जाणीव असणे आवश्यक असते.