Marathi Story -वाचन मित्र- बासरीवाला मुलगा आणि लबाड गावकरी!

Marathi Story -वाचन मित्र-गोष्ट क्रं.6

 बासरीवाला मुलगा आणि लबाड गावकरी!

  खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका गावामध्ये  उंदरांचा सुळसुळाट खूप मोठ्या प्रमाणावर झाला होता आणि घरात,शेतात दुकानात  नुसते उंदीर उंदीर झाले होते.त्यामुळे अन्नधान्याचे नुकसान खूप मोठ्या प्रमाणावर होत होते.या उंदरांचा नायनाट करायचा असे गावकरी ठरवतात. 

 अनेक उपाय करुनही त्यांना यश येत नाही ही गोष्ट शेजारच्या गावातल्या एका बासरीवाल्याला कळाली तो त्या गावात येतो व गावकऱ्यांना सांगतो की, 

"मी या उंदराचा बंदोबस्त करतो,तुम्ही मला त्या बदल्यात शंभर सुवर्णमुद्रा द्या!" 

गावकरी तयार होतात.नंतर तो बासरीवाला बासरी वाजवत पूर्ण गावात,शेतात फिरतो त्याच्या बासरीचा सूरामुळे आकर्षित होऊन सर्व उंदीर त्याच्या पाठी मागे धावू लागतात. तो तसाच बासरी वाजवत नदी कडे जातो व पाण्यात उतरतो त्याच्या मागोमाग उंदीरही नदीत जातात व पाण्यात बुडून मरतात. बासरीवाला गावांकार्‍याना आपली बिदागी मागतो. परंतु गावकरी शंभर मुद्रा द्यायला नकार देतात. बासरीवालाला गावकऱ्यांची लबाडी लक्षात येते. तो पुन्हा बासरी वाजवत गावातून येऊ लागतो सर्व लहान मुले बासरीचे सूर ऐकून त्याच्याकडे आकर्षित होतात व त्याच्या मागे मागे धावू लागतात तो बासरी वाजवत नदीकडे जाऊ लागतो. मुलेही नदीकडे जाऊ लागायला लागतात गावकऱ्यांना भीती वाटायला लागते बासरी वाल्या च्या मागे जाऊन आपली मुले पाण्यात बुडतील त्यामुळे गावकरी त्याला थांबवून शंभर  सुवर्णमुद्रा देतात.

तात्पर्य-उपकार करणाऱ्या सोबत कृतघ्नपणा वागू नये.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने