Panhalgad Fort Information In Marathi.

पन्हाळगड किल्ल्याची संपूर्ण माहिती मराठी.


Panhalgad Fort Information : ऐतिहासिक दृष्ट्या पन्हाळगड हा किल्ला अतिशय महत्त्वाचा असून  पन्हाळगड किल्ला कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा या तालुक्यामध्ये आहे. पन्हाळा किल्ला साधारण 1200 वर्षापूर्वीचा इतिहास सांगतो. या गडाला खूप जुना इतिहास आहे,असे समजले जाते. 


महाराष्ट्रातील किल्ले।पन्हाळा।पन्हाळगड किल्ला।Panhalgad Fort

पन्हाळा किल्ल्याविषयी माहिती.

किल्ल्याचे नाव - पन्हाळगड
किल्ल्याचा प्रकार - गिरीदुर्ग
डोंगररांग - कोल्हापूर
जिल्हा- कोल्हापूर 
श्रेणी - सोपी
समुद्रसपाटीपासुन उंची - 977.2 मीटर (4040 फूट)
तालुक्याचे ठिकाण - पन्हाळा 
किल्ल्याचे बांधकाम - इ.स.1178 ते 1299 दरम्यान झाल्याचे समजले जाते.

पन्हाळगड किल्ल्याचे ऐतिहासिक वैशिष्ट्ये:


भोज राजा नृसिंह यांच्या कालखंडात हा किल्ला बांधला गेला आहे असे सांगितले जाते. भोजराजा यांनी इ.स.1178 ते 1299 या कालखंडामध्ये गडाचे बांधकाम केल्याचे काही पुरावे आढळून आलेले आहेत.दख्खन पठारावरील हा पन्हाळगड किल्ला सर्वात मोठा किल्ला समजला जातो. 

पन्हाळा किल्ल्यावर पूर्वी नाग जमातीतील वर्चस्व होते.याच किल्ल्याला पूर्वी पन्नग्नालय म्हणून ओळखला जात असे. तसेच या गडाला पर्णालदुर्ग देखील म्हटलं जात असे.ब्रम्हदेवाने या डोंगरावर तपश्चर्या केल्यामुळे पुराना मध्ये याचा उल्लेख ब्रह्मशैल या नावाने आहे.

सिद्दी जौहर क्रूर होता,त्याची शिस्त कठोर होती,त्याने पन्हाळगडाला चौसर वेढा घातलेला होता. शिवरायांना किल्ल्यात  कोंडले गेले होते.कारण सिद्दीने संपूर्ण पन्हाळ गडाला वेढा दिला होता. पावसाळ्याचे दिवस जवळ आले होते. पावसाळा सुरू झाला की,सिद्दी जौहर वेढा उठविल असे शिवरायांना वाटले होते.पण पाऊस सुरू होत असल्याने वेढा अधिक कडक करून गडावर ची शिदोरी बंद करून टाकली, तसेच गडावर सर्व शिदोरी संपून गेली तेव्हा युक्तीने सुटका करून घेण्यसाठी शिवरायांनी हालचाल सुरू केली. 



शिवरायांनी सिद्दीजोहरला निरोप पाठवून लवकरच किल्ला तुमच्या स्वाधीन करतो असे कळवले.त्या वेळेस सिद्दी जौहर खुश झाला.अनेक दिवसाचा वेढा दिल्याने सिद्दी जौहर जवळचे सैनिक ही कंटाळून गेले होते. तेव्हा शिवाजी महाराज आपल्याला शरण येत आहेत हे ऐकून त्यांना खूप आनंद झाला. शिवरायांनी वेढ्यातून निसटून जाण्यासाठी एक युक्ती आखली होती. त्यांनी दोन पालख्या सज्ज केल्या होत्या.

शिवराय अवघड वाटेने बाहेर जाणार आणि दुसरीकडून शिवरायांच सोंग घेतलेली व्यक्ती रास दिंडी दरवाजातून बाहेर जाणारी दुसरी पालखी शत्रू सैन्याला सहज दिसणार असल्याने ती पकडली जाणार आणि  शिवाजीराजांचे पकडल्याची समजून शत्रू जल्लोष करणार एवढ्यात शिवराय अवघड वाटेने निघून जाणार अशी ती युक्ती होती. 

शिवा काशिद सारख्या स्वराज्यातील प्रामाणिक आणि शूर लढवय्या सैनिकांमुळे शिवाजी महाराजांची सुटका होण्यास मदत मिळाली सिद्धी जोहरने ज्यावेळी महाराजांचा पाठला केला त्यावेळेस शिवा काशिद महाराजांचे सोंग घेतल्याने सिद्दी जौहर आणि महाराजांना पळून  जाण्याची संधी मिळाली यात शिवा काशिद या सैनिकांनी प्राणाची आहुती दिली. 

सिद्धी जोहर ने महाराजांचा पाठलाग केला असता परंतु शूर वीर बाजीप्रभू देशपांडे यांनी घोडखिंडीत त्यांची वाट आडवून सिद्धी जोहरच्या सैनिकांसोबत प्राणपणाने झुंज देऊन शिवाजी महाराजांना सुखरुप विशाळगडावर पोहचून दिले. या लढाई बाजीप्रभू  त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यामुळे आजही घोडखिंड ही पावनखिंड म्हणून ओळखली जाते. पन्हाळगड हा शिवरायांचा आवडता किल्ला असल्याने शिवरायांनी पन्हाळगड किल्ला पुन्हा स्वराज्यात आणला .


औरंगजेबाने इसवी सन 1701 मध्ये हा किल्ला परत जिंकला.त्याच वर्षी रामचंद्रपंत अमात्यांनी तो परत जिंकून घेतला. पुढे इ. स.1705 मध्ये ताराराणीने पन्हाळा ही कोल्हापूरची राजधानी बनवली.मध्ये शाहू महाराजांनी हा किल्ला ताराराणी कडून जिंकून घेतला इसवीसन सतराशे नऊ मध्ये ताराराणी हा किल्ला परत जिंकून घेतला त्यानंतर इ.स.1782 मध्ये पन्हाळा ही कोल्हापूरची राजधानी होती.इ.स.1827 मध्ये पन्हाळा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.

पन्हाळगड किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे:


पन्हाळगडावरील राजवाडा:

ताराराणी यांनी  इ.स.1708 मध्ये या राजवाड्याचे बांधकाम केले. हा वाडा प्रेक्षणीय असून वाड्यामध्ये देवघर हे पाहण्यासारखे आहे. 

पन्हाळगडावरील राजदिंडी:

ही एक दुर्गम वाट गडाखाली उतरते. या वाटेचा उपयोग करून शिवराय सिद्धी जोहरच्या वेढ्यातून निसटले होते. विशाळगडावर जाणारी एकमेव वाट आहे,राजदिंडी या दरवाजातून पंचेचाळीस मैल अंतर कापून महाराज विशाळगडावर पोहोचले होते.

पन्हाळगडावरील सज्जा कोठी:

राजवाड्यावरून पुढे गेल्यावर ही कोठीवजा इमारत दिसते,ही इमारत दोन मजले असून इ.सन 1008 मध्ये        बांधण्यात आलेली आहे असे समजते. पन्हाळ्याच्या वेड्याच्या वेळी या इमारतीमध्ये शिवाजी महाराजांची गुप्त खलबते चालत असत.याच इमारतीस संभाजी राजांना शिवरायांनी या प्रांताचा कारभार पाहण्यासाठी ठेवले होते.



पन्हाळगडावरील शिवमंदिर:

शिवाजी महाराजांचे हे मंदिर ताराराणी राजवाड्याच्या समोर असून छत्रपती शाहू महाराजांनी हे मंदिर बांधलेले आहे होते.या मंदिरात शिवाजी महाराजांची संगमरवरी मूर्ती आहे. मूर्ती शेजारी ताराराणीच्या पादुका आहेत. मंदिराच्या मागच्या बाजूला सवी सन पूर्व तिसर्‍या शतकातील काही गुहा आहेत.

पन्हाळगडावरील अंबरखाना:

अंबारखाना हा पूर्वी बालेकिल्ला होता.अंबरखाना समोरच सर्व बाजूंनी खंदक आहेत येथे गंगा, यमुना आणि सरस्वती असे तीन धान्याची कोठारे आहेत. यात वरी नागली आणि भात असे सुमारे 25 हजार खंडी धान्य साठवले जात असे  यांना हवा व प्रकाश खेळण्यासाठी झरोके आहेत. 

पन्हाळगडावरील चार दरवाजा:

हा दरवाजा हा पूर्वेकडील अत्यंत मोक्याचा व महत्वाचा दरवाजा असून इ.सन 1844 मध्ये हा दरवाजा इंग्रजांनी पाडून टाकला त्याचे अवशेष अजूनही शिल्लक आहेत. येथेच शिवा काशीद यांचा पुतळा पाहण्यासारखा आहे.

पन्हाळगडावरील सोमेश्वर तलाव:

पन्हाळगडाच्या पेठे जवळ हे एक मोठे तळे असून तळ्याच्या काठावर सोमेश्वर चे मंदिर आहे या मंदिराला महाराजांनी सहस्त्र मावळ्यांनी लक्ष्य चाफ्याची फुले वाहिली होती.

पन्हाळगडावरील संभाजी मंदिर:

रेडे महालाच्या पुढे एक छोटी गढीवजा मंदिर आहे. हे छत्रपती राजाराम यांचा पुत्र संभाजी यांचे आहे मंदिरात शिलालेख आहे तर मंदिराच्या आवारात विहीर आहे.

पन्हाळगडावरील रामचंद्रपंत अमात्य:

यांची समाधी सोमेश्वर तलावापासून पुढे गेल्यावर दोन समाध्या दिसतात,त्यातील उजवीकडची रामचंद्रपंत अमात्य व त्यांच्या बाजूची समाधी त्यांच्या पत्नीची आहे.

पन्हाळगडावरील रेडे महाल:

पन्हाळा गडावर एक आडवी इमारत दिसते त्यास रेडे महाल म्हणतात. ही एक पागा आहे, यामध्ये काही काळानंतर जनावरे बांधत म्हणून त्याला रेडे महाल म्हणतात. 

पन्हाळगडावरील धर्मकोठी:

छत्रपती संभाजी मंदिरापुढे गेल्यावर ही एक इमारत दिसते, ती धर्मकोठी असून या ठिकाणी दानधर्म केला जात. 

पन्हाळगडावरील महालक्ष्मी मंदिर:

राजवाड्यातून बाहेर पडल्यावर नेहरू उद्यानाच्या खालच्या बाजूला महालक्ष्मी मंदिर आहे.हे पन्हाळगडावरील प्राचीन मंदिर असून ते साधारण एक हजार वर्षांपूर्वीची असाव असे समजले जाते.

पन्हाळगडावरील तीन दरवाजा:

तीन दरवाजा  पश्‍चिमेकडील सर्वात महत्त्वाचा दरवाजा असून याला कोकण दरवाजा असे म्हटले जाते, या दरवाजावरील नक्षीकाम खूप सुंदर असून दरवाजावर एक शिलालेख आढळून येतो.

पन्हाळगडावरील पुसाटी बुरुज:

पन्हाळगडाच्या पश्चिम टोकावर साठी बुरुज आहे येथे दोन बुरुज असून त्यामध्ये खंदक आहेत बुरुज  घडीव दगडात बांधलेला आहे.त्याची उंची साधारण वीस फूट आहे. 

पन्हाळगडावरील शूरवीर बाजीप्रभूंचा पुतळा:

एस टी थांब्यावरून थोडे खाली आल्यावर एका ऐसपैस मोठ्या चौकांमध्ये शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांचा पुतळा आहे. 

पन्हाळगडावरील नागझरी:

पन्हाळगडावर वर्षभर पाण्याचे दगडात बांधलेले एक कुंड असून यालाच नागझरी असे म्हटले जाते , नागझरी जवळच हरिहरेश्वर व विठ्ठलाचे मंदिर आहे.

पन्हाळगडावरील दुतोंडी बुरुज:

पन्हाळगडावरील न्यायालयाजवळ दोनही बाजूंनी पायर्‍या असलेला एक बुरूज आहे,त्याला दुतोंडी बुरुज म्हणतात.  या बुरुजापासून काही अंतरावर असलेल्या बुरुजाला दौलत बुरुज असे म्हटले जाते. या शिवाय गडावर मोरोपंत ग्रंथालय कलावंतिणीचा महल इत्यादी ठिकाणी पाहण्यासारखे आहेत.  

पन्हाळगडावर कसे जावे:

पन्हाळगडावर पोहोचण्यासाठी एसटीने किंवा खाजगी वाहनाने थेट किल्ल्यावर जाता येते पन्हाळगड किल्ला पाहण्यासाठी किमान दोन दिवस तरी पाहिजेत . तसेच पन्हाळगडावर राहण्याची आणि जेवणाची सोय साठी हॉटेल्स आहेत. तसेच निवास करण्याची सोय सुद्धा उपलब्ध आहे. या किल्ल्यावर जाण्यासाठी तुम्ही बाराही महिन्यामध्ये  जाऊ शकता.

नवीन नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमचा What's app group join करा.


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने