अधिक पैसे कमवण्याचा योग्य मार्ग: व्यवसाय, नोकरी.

अधिक पैसे कमवण्याचा योग्य मार्ग: व्यवसाय, नोकरी.

करिअर निवडताना।व्यवसाय करणे योग्य की नोकरी -वाचन मित्र
करिअर निवडताना

करिअर निवडताना कोणते महत्त्वाचे घटक विचारात घेतले पाहिजेत?

करिअर निवडताना आवश्यक मुद्दे:

करिअर निवडताना कोणते महत्त्वाचे घटक विचारात घेतले पाहिजेत? सध्याची वाढती स्पर्धा लक्षात घेता सुशिक्षित बेरोजगार तरुण वर्गाची संख्या अतिशय वेगाने वाढताना दिसत आहे.शिक्षण घेऊनही अनेकांना तरुणांना नोकर्‍या नाहीत,शासनाचे जागा भरण्याची कंत्राटी भरती पद्धत या सर्व गोष्टींना तरुण वर्ग कंटाळलेला असून,त्यांचा मनाची द्विधाअवस्था पाहायला मिळत आहे.पालकांना योग्य निर्णय घेता येणे कठीण झालेले आहे.

प्रत्येक माणसाची गरज आहे आता पैसा झालेली आहे.आयुष्यात जगण्यासाठी पैसा महत्वाचा असून आपल्या इच्छेनुसार जगण्यासाठी मानवाला आयुष्यात पैसा कमवणे हे एक प्रकारचे होऊन बसले आहे. प्रामुख्याने कौटुंबिक जबाबदाऱ्या प्रत्येकाच्या खांद्यावर असतात. सर्वसामान्यांसाठी अर्थार्जनाच्या दोन वाटा आपल्याला पाहायला मिळतात. एक नोकरी आणि दुसरी व्यवसाय. शेती सर्वांकडे असेल ह्याची काय शास्वती नसते.

जगातील वाढती महागाई तसेच शिक्षण पूर्ण करण्यासाठी सर्वसामान्यांच्या होणाऱ्या कसरती इत्यादी सर्व गोष्टी लक्षात घेतल्या तर सर्वसामान्यांचे जीवन हे विस्कळीत होऊन गेलेली आहे.

त्यामुळे अनेक आई-वडिलांना आपल्या मुलाला नोकरी लावण्यासाठी फक्त गुणवत्ता  असून उपयोगाची राहिलेली नाही तर, त्यासोबत पैसा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो आणि आई-वडिलांकडे एवढे सगळे पैसे नसल्याने एवढा सगळा खर्च करणे त्यांना शक्य नसल्याने,कुठल्यातरी छोट्या कमी गुंतवणुकीच्या व्यवसायात आपल्या मुलाचे काहीतरी भले होईल यादृष्टीने विचार करायला सुरुवात होते. 

व्यवसाय करायचा म्हणजे भांडवल हे उभा करावेच लागते.नोकरी आणि व्यवसाय या मध्ये कष्ट केले तरच यश आणि पैसा मिळू शकतो.नोकरी केली तर नोकरीचे काय फायदे आहेत तसेच व्यवसाय केला तर व्यवसायाचे फायदे आणि तोटे याचा विचार होणे आवश्यक झालेले आहे. तसेच अशी एक म्हण प्रचलित आहे,"उत्तम शेती मध्यम व्यापार,कनिष्ट नोकरी."

नोकरी करण्याचे फायदे:

  • नोकरी करणाऱ्या व्यक्तीला रोज कामावर नियमात वेळेत उपस्थित राहणे बंधनकारक असते. म्हणजेच नोकरी करणाऱ्या व्यक्तीला वेळेचे बंधन असते. 
  • मालकाकडून वेगवेगळे सवलती तसेच आरोग्य विमा या भेटत असतात.व नोकरी सरकारी असेल तर निवृत्तीनंतर आर्थिक फायदे मिळत असतात. 
  • नोकरी करणाऱ्या व्यक्तींना बँकेकडून कर्ज उपलब्ध होते.  
  • महिन्याच्या घरी नियमित पगार मिळतो,त्यामुळे कौटुंबिक स्थैर्य प्राप्त होते. 
  • कामाचे ठरलेल्या वेळा तसेच आपल्याला सोपवलेले काम आहे इतकेच आपण जबाबदारी घेऊ शकतो.
  • उद्याचा उत्पन्नाची शाश्वती ही नक्की ठरलेले असते. 
  • नियमित सुट्ट्या मिळतात तसेच आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्यायला जास्त वेळ मिळतो.
  • नोकरी करत असताना वैयक्तिक कुठल्याही प्रकारचा तोटा होत नाही. 
  • नोकरीमध्ये पगार हा टप्प्याटप्प्याने वाढतच राहतो. महागाई भत्ते मिळत राहतात. 

नोकरी करण्याचे तोटे:

  • नोकरी करण्याचे तोटे म्हणजे जे ठरवून दिलेला पगार असेल तेवढाच पगारात समाधानी राहावे लागेल. 
  • नोकरीमध्ये वरिष्टाचे ऐकून घ्यावे लागते.
  • नोकरी मध्ये मनमानी चालत नाही. 
  • नोकरी मध्ये वेळेचे बंधन असते. 
  • नोकरीमध्ये काही चुका झाल्यास नोकरीवरून कमी करण्याची अथवा कारवाई होण्याची शक्यता असते. 
  • नोकरी ही जबाबदारी असून ती पूर्ण करावी लागते. 
  • नोकरी मध्ये जॉब चार्ट(Job Chart) असतो आणि त्यानुसार काम करावे लागते. 

व्यवसाय करण्याचे फायदे:

  • व्यवसायात आपण स्वतः मालक म्हणून काम पाहतो.  
  • अनेक गोष्टी आपल्या सोयीनुसार करून घेऊन आपण आपले छंद आवड निवड या गोष्टीला वेळ देऊ शकतो.  शिस्तबद्ध आणि नियोजन चांगल केल तर उत्पन्नही चांगले भेटते व्यवसाय मध्ये आर्थिक विकास होण्यासाठी कुठल्याही प्रकारची मर्यादा नसते. 
  • घेतलेल्या कठोर मेहनतीचे फळ नक्कीच मिळत असते. व्यवसायाच्या भरभराटीसाठी खूप मोठी संधी असते.  व्यवसायात जेवढी जास्त मेहनत तेव्हढी मिळकत जास्त असते. 
  • कामासाठी कर्मचारी निवडताना हुशार निवडले तर यश भरभरून मिळते. व्यवसायांमध्ये पुढील पिढ्यांसाठी आपण काही सोयीसुविधा करून ठेवू शकतो.
  • आपल्या प्रगतीमध्ये आड येणाऱ्या गोष्टींना आपण प्रतिकार करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्याला कुठल्याही प्रकारची कोणाचेही कशाचेही बंधन व्यवसाय मध्ये नसते. 
  • व्यवसाय कसा करायचा ते आपण आपल्या आवडीनिवडीनुसार ठरवत असतो. 

व्यवसाय करण्याचे तोटे:

  • व्यवसाय हा आपल्या मेहनत कशी करतो त्यावर अवलंबून असते. 
  • व्यवसायात सध्या स्पर्धा खूप वाढली असल्याने आर्थिक फायदा होईल याची शास्वती नसते.
  • व्यवसायात गुणवत्ता टिकवणे महत्वाचे असते.तसेच समोरचे कस्टमर यांची आवड निवड यांची शहानिशा करावी लागते.
  • व्यवसाय करताना हिम्मत,आणि संयम आवश्यक असतो.कधी कधी तोटा तर कधी कधी नफा होतो.
  • सतत स्पर्धेला तोंड द्यावे लागते. सुरवातीच्या काळात खूप मेहनत घ्यावी लागते.
  • व्यवसाय करण्यासाठी आर्थिक बाब खूपच महत्वाची असून नफा आणि तोटा याचे गणित व हिशोब मांडणी योग्य प्रकारे मांडता आले पाहिजे. 
  • व्यवसायात ग्राहकांची मनधरणी करावी लागते.तसेच कर्ज घेऊन भांडवल उभा करावे लागते. 
  • व्यवसायात अपयश पचवून त्यावर मात करण्यासाठी जिद्द आणि चिकाटी महत्वाची असते. 
  • वरील मुद्याचा विचार करून नोकरी करावी की व्यवसाय याची निवड करणे सोपे होईल, असे वाटते. 
  • बर्‍याच वेळा आपण मेहनत करून व्यवसाय उभा करतो आणि त्याचा लाभ आपल्या पुढील पिढीला होतो ,आपले सर्व आऊष्य कष्ट करण्यात जाते. 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने