शैक्षणिक व शाळेतील विद्यार्थ्यांसाठी उपयोगी अँड्रॉइड ॲप्स.

प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त शैक्षणिक अँड्रॉइड ॲप्स.

Android Apps -शैक्षणिक व शाळेतील विद्यार्थ्यांसाठी उपयोगी
Educational Android Apps

सध्या वाढता मोबाईल चा वापर पाहता आपल्याला अनेक कामे करण्यासाठी उपयोगी पडणारे अँड्रॉइड ॲप्स मुळे आपले जीवन खूप सुखकर,तसेच सोपे झाले आहे.नवीन नवीन अँड्रॉइड ॲप्स (Android Apps)चा वापर करून आपले अनेक कामे आपण संगणाकाऐवजी मोबाईल वर करू लागलो आहोत.

आपल्या Android Smartphone मध्ये नेहमी आपण आपल्याला आपल्या कामासाठी उपयोगी पडतील असे Apps आपण ठेवत असतो. Android Apps चे सुध्दा कामानुसार वेगवेगळे प्रकार पडतात. सर्वसाधारणपणे गुगल प्ले स्टोअर वर प्रत्येकाची गरज काय आहे. 

यानुसार वेगवेगळ्या प्रकारचे अँड्रॉइड ॲप्लिकेशन उपलब्ध असून वेगवेगळ्या राज्यातील वेगवेगळ्या भाषेतील वेगवेगळ्या प्रकारातील ॲप्लीकेशन आपल्या गरजेनुसार आपण घेऊ शकता त्यासाठी काही अँड्रॉइड एप्लीकेशन ची माहिती आपण पुढील मुद्द्यांच्या आधारे घेऊया.

अभ्यासासाठी उपयोगी अँड्रॉइड ॲप्स.

Google Keep -Android App.

Google Keep Android App हे एक अँड्रॉइड ॲप असून,हे गूगल उत्पादन आहे. या गुगल किप अँड्रॉइड ॲप च्या मदतीने आपण आपल्या अभ्यासाच्या Notes काढल्यानंतर या ठिकाणी जतन करून ठेवू शकता. 

शाळेतील विद्यार्थ्यांसाठी Google Keep अँड्रॉइड ॲप खूप महत्त्वाचे असून यामध्ये तुम्ही तुमच्या नोट्स लेखन करून जतन करून ठेवू शकता.तसेच वेगवेगळ्या फोटोच्या स्वरूपात जतन करून ठेवू शकता.शैक्षणिक रोजचा अभ्यास यात जतन करून ठेवू शकता.दररोज चे कामाची डायरी सुद्धा यामध्ये लिहिता येते.हे एक Notes app आहे.

काही गोष्टी आपल्या लक्षात येतात आणि थोड्या वेळात आपण त्या परत विसरुन जात असतो. अशावेळी आपल्या हातात अँड्रॉइड मोबाईल असेल तर त्यामध्ये हे गुगल कीप ॲप इंस्टॉल करून ठेवा, जेणेकरून आपल्याला आपल्या मनात आलेले विचार तत्काळ गुगल कीप ॲप मध्ये लिहून ठेवता येतील. 

शक्‍यतो गुगल की नोट पॅड लेखन करणाऱ्या लोकांना जास्त फायदेशीर असून त्यामध्ये वेगवेगळे पोस्टर, पावती किंवा फोटोच्या माध्यमातून तुम्ही डेटा जतन करून ठेवू शकता आणि आपल्याला हवा तेव्हा त्याचा वापर वाचन करण्यासाठी करू शकता. 

हे वापरण्यासाठी अतिशय सोपे असून अभ्यासामध्ये शाळेतील मुलांना याचा चांगल्या प्रकारे उपयोग करता येईल, तुम्हाला Google Play Store मधून download करून इंस्टॉल करावे लागेल.हे वापरण्यासाठी सुरक्षित आणि मोफत आहे.

Photo Math -Android App.

Photo Math Android App हे गणितीय समीकरणे सोडवण्यासाठी डिझाईन केलेले अँड्रॉइड ॲप असून गणित विषयासंदर्भातील वेगवेगळी उदाहरणे हे तुमच्या मोबाईलचा कॅमेरा ने गणितीय समीकरणे प्रश्न स्कॅन करून नंतर तुमच्या स्क्रीनवर उत्तरे स्पष्ट दिसण्यासाठी तसेच हे ॲप अंकगणित पासून ते कॅल्क्युलेटर स्तरापर्यंत च्या साध्या ती जटिल गणितांच्या समस्या सोडण्यासाठी सक्षम आहेत.

तुम्हाला या Android App च्या मदतीने गणिते स्कॅन करून किंवा प्रश्नाचे स्कॅनिंग करून त्याचे उत्तर मिळते. हे ॲप मोफत असून ते तुम्ही प्ले स्टोर वरून मोफत इंस्टॉल करू शकता.

Oxford Dictionary -Android App.

Oxford Dictionary  Android App हे एक अँड्रॉइड ॲप असून English Dictionary App आहे.वेगवेगळे इंग्रजी शब्दाचे संग्रहामध्ये असल्याने तुमचे शब्द संग्रह वाढविण्याचे काम यामध्ये होईल यामध्ये वेगवेगळे फीचर्स दिलेले आहेत त्यानुसार तुम्ही त्याचा वापर मोफत करू शकता.

Khan Academy -Android App.

Khan Academy Android App या अँड्रॉइड ॲप्स मदतीने तुम्ही फिजिक्स केमिस्ट्री गणित इत्यादी विषयाची व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी मिळतील आणि त्याचा अभ्यास करून तुम्ही तुमचे कौशल्य सुधारण्यास मदत होईल.हे App Google Play Store उपलब्ध आहे.

BYJU, S -Android App.

BYJU,S Android App हे एक अँड्रॉइड ॲप असून हे BYJU,S उत्तम शैक्षणिक अँड्रॉइड ॲप आहे यामध्ये व्हिडिओची वेगवेगळे लेसन तुम्हाला पाहायला मिळतील, तसेच तुम्ही यामध्ये चाचणी सुद्धा सोडू शकता आणि इतरांशी शेअर करू शकता.

Cam Scanner -Android App.

Cam Scanner हे एक अँड्रॉइड ॲप असून यामध्ये शक्यतो भारतीय बनावटीचे हे सुरक्षित आणि वापरण्यास सोपे सुलभ असून भारतीय बनावटीचे घेणे फायद्याचे होईल. तसेच कॅम स्कॅनर मध्ये आपण आपल्या वेगवेगळ्या पुस्तकाची स्कॅन करून त्याच्या प्रिंट आउट काढू शकतो. 

हे एक शैक्षणिक अभ्यासात उपयोगी ठरणारे Android App या ॲपच्या मदतीने तुम्ही एखाद्या पुस्तकातील आवडता मजकूर स्कॅन करून तो आपल्या मोबाईल मध्ये जतन करून ठेवू शकता, या मध्ये वेगवेगळे पर्याय असून ते तुम्ही शेअर सुद्धा करू शकता. हे ॲप वापरण्याचा मोफत आणि गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे Cam Scanner हे भारतीय app घेणे सुरक्षित असेल.

Diksha -Android App.

दीक्षा (Diksha Android App) ॲप्स प्राथमिक शाळा तसेच माध्यमिक शाळेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी खूप उपयोगी यापासून याच्या मदतीने तुम्ही ऑनलाईन अभ्यास करू शकता.यामध्ये इयत्ता नुसार वेगवेगळ्या प्रकारे अभ्यासक्रम समाविष्ट केलेले असून,Diksha Android App वापर करण्यासाठी शासनाने सुद्धा प्रोत्साहन दिले आहे. हे वापरण्यास सोपे असून या डाऊनलोड करण्यासाठी तुम्ही प्ले स्टोर वरून मोफत ॲप इन्स्टॉल करून घेऊ शकता.

V School -Android App.

व्ही स्कूल - V School Android App ॲप हे एक उत्तम शैक्षणिक ॲप पासून या ॲपमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अभ्यासक्रम समाविष्ट केलेला आहे हे ॲप वापरण्यासाठी शासनाने सुद्धा प्रसाद दिलेले आहे स्कूल ॲपचा वापर हा महाराष्ट्रातील मुलांना शिक्षणासाठी खूप मोठ्या प्रमाणावर होत असून हे ॲप अँड्रॉइड मोबाईल मध्ये चालते, तसेच हे ॲप गूगल प्ले स्टोर वरून मोफत आपल्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून घेऊ शकता. हे ॲप वापरण्यासाठी मुलांना सोयीस्कर आहे.

Google Classroom -Android App.

गूगल क्लासरूम।Google Classroom Android App हे एक ऑनलाईन टीचिंग करण्यासाठी उपयोगी ठरते. यामध्ये वर्गामध्ये ज्याप्रमाणे शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात त्याचप्रमाणे ऑनलाइन पद्धतीने शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवू शकतात हे ॲप प्ले स्टोअर वर उपलब्ध असून हे गुगलचे सुरक्षित Android app आहे.हे सुद्धा वापरण्यासाठी मोफत आहे.

What's App -Android App.

What's App Android App जगातील खूप प्रसिद्ध अँड्रॉइड ॲप असून याच्या मदतीने वेगवेगळ्या प्रकारची शैक्षणिक ग्रुप तयार करून यामध्ये अभ्यासाच्या नोट्स शेअर करता येतात.तसेच टाईप करता येतात,फोटोच्या सहाय्याने शेअर करता येतात हे एक मेसेजिंग यापासून हे शाळेतील विद्यार्थ्यांना नोट शेअर करणे आणि चर्चा करण्यासाठी फार उपयोगी आहे.

Google Translate -Android App.

गूगल ट्रांसलेट-Google Translate Android App हे गुगलचे अँड्रॉइड ॲप असून हे वापरणे खूप सोयीचे आणि सोप असून गूगल ट्रांसलेट च्या मदतीने आपण कोणत्याही भाषेचे ट्रान्सलेट आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये करून वाचन करू शकतो. गूगल ट्रांसलेट हे गुगल प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध आहे. भाषांतर करण्यासाठी विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या याचा वापर करता येऊ शकतो.तसेच वेगवेगळ्या शब्दाचे अर्थ किंवा भाषांतर करू शकतो.

Reddit -Android App.

Reddit हे सुद्धा एक चांगले Android App असून त्याचा उपयोग महाविद्यालयीन विद्यार्थी शिक्षक यांना होतो,या अप्प मध्ये ग्रुप हे विषयानुसार जॉइन करून त्यातील आपल्या उपयोगी माहिती चा अभ्यास करू शकता,हे android app प्ले स्टोअर मध्ये मोफत असून ते जगभरात वापरले जाणारे android app आहे. 

Quora -Android App.

Quora Android app वेगवेगळ्या भाषेमध्ये उपलब्ध असणारे प्रसिद्ध अँड्रॉइड ॲप आहे. यामध्ये प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रश्नाचे उत्तर,लिहिणे,वाचणे तसेच प्रश्न विचारण्यासाठी सुद्धा कोरा हे वापरू शकता.

YouTube -Android App.

यू ट्यूब हे एक videos च्या माध्यमातून ज्ञान घेण्याचे चांगले साधन असून त्याच्या,साह्याने आपण दृश्य स्वरूपात वेगवेगळे लेसन पाहू शकतो,YouTube वर वेगवेगळे शैक्षणिक चॅनल उपलब्ध असून त्याचा वापर आपण अभ्यासात चांगल्या प्रकारे करू शकतो. 

या व्यतिरिक्त अनेक android apps उपलब्ध असून त्याचा सुद्धा आपण वापर करू शकता,कारण प्रत्येक विद्यार्थ्यांना त्याच्या गरजेनुसार वेगवेगळ्या android apps ची गरज पडू शकते. 

सूचना - वरील Android apps हे वापरण्यासाठी उत्तम आहेत परंतु,ते तुम्ही आपल्या जबाबदारीवर वापरावे कोणाचे काही नुकसान झाल्यास आम्ही जबाबदार राहणार नाहीत. 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने