OTP।ओ टी पी म्हणजे काय?
OTP म्हणजे काय |
OTP कशाला म्हणतात?
"एकदाच पाठवला जाणारा पासवर्ड किंवा पिन म्हणजे ओ टी पी होय."
मोबाईल नंबर किंवा आपल्या ईमेल वर OTP ओ टी पी नंबर पाठवला जातो.ज्यावेळी OTP ओटीपी नंबर पाठवला जातो त्यावेळी तो ठराविक वेळेत च वापरणे अनिवार्य असते.ओटीपी नंबर हा गोपनीय असल्याने तो आपल्या Account ला सुरक्षित ठेवतो म्हणून तो इतरांना शेअर करू नये.
जर तो इतरांना शेअर केला किंवा कोणी तुमचा OTP ओटीपी नंबर चोरला तर तुमच्या Account धोक्यात येऊ शकते.शक्यतो ज्या ठिकाणी पैश्याचे व्यवहार केले जातात तेथे ओटीपी नंबर वापर केला जातो.उदा. मोबाईल बँकिंग,इंटरनेट बँकिंग इत्यादी.
OTP।ओ टी पी चा फूल फॉर्म.
- O-One
- T-Time
- P-Password
OTP ओ टी पी चे महत्व।OTP चे फायदे।ओटीपी नंबर चा वापर कसा आणि कुठे करतात?
- आपले Account सुरक्षीत राहण्यासाठी ओ टी पी चा उपयोग होतो.
- OTP ओ टी पी चा वापर आपण काही वेळेपर्यंत च वापरणे आवश्यक असते.अन्यथा जास्त वेळेनंतर त्याचा उपयोग करणे शक्य नसते.अशा वेळी दुसरा otp जनरेट करावा लागतो.
- OTP चा वेळ 30 सेकंद ते 30 मिनिट पर्यंत असू शकतो.
- एकदा वापरलेला ओ टी पी परत परत वापरू शकत नाही.
- आता जवळ जवळ सर्व मोबाईल मध्ये ओ टी पी OTP येतो.
- वेगवेगळे सोशल मीडिया चे ॲप मध्ये Log in करण्यासाठी ओ टी पी System कार्यान्वीत करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते.
- तसेच वेबसाईट,ब्लॉग,ईमेल,बँकेचे खाते इत्यादी ठिकाणी ओ टी पी नंबर वापरला जातो.
- जेव्हा एखादे वेबसाईट अकाउंट खूप दिवस निष्क्रिय राहिले तर वापरकर्ता पडताळणी करण्यासाठी otp ही पद्धत अवलंबली जाते.
- OTP ओ टी पी चा वापर केल्याने आपली फसवणूक होणे टाळले जाते.
- OTP ओ टी पी चा वापर हा मूळ मालक आहे की दुसरा कोणी आहे हे समजते.
- तसेच एखादे अकाउंट आपण दुसऱ्या डिव्हाईस वर Log in केले तर त्याला परवानगी देण्यासाठी otp तुमच्या मोबाईल वर पाठून मूळ वापरकर्ता आहे की नाही याची खात्री केली जाते.
OTP।ओ टी पी चे प्रकार.
- एसएमएस।SMS
- Voice Calling।व्हॉईस कॉलिंग
- E mail।ईमेल.
- OTP हा मेसेज च्या सहाय्याने आपल्या मोबाईल वर पाठवला जातो.
- कधी कधी आपल्याला व्हॉईस कॉलिंग करून ओ टी पी मिळतो.
- तसेच ईमेल च्या साह्याने आपल्याला ओटीपी आपल्या ईमेलवर सेंड केला जातो.
वरील तिन्हीही प्रकारात आपला मोबाईल नबर किंवा ईमेल पत्ता अगोदर संबंधित साईट कडे अगोदर रजिस्टर केलेला असावा लागतो तरच ओ टी पी प्राप्त होतो.