ई मेल कसा करावा?
नमस्कार,आपण ई मेल कसा लिहावा या विषयी संपूर्ण माहिती घेऊया.ई मेल E mail हा आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचा भाग असून प्रत्येक ठिकाणी आपल्याला ई मेल ची गरज भासत असते.
त्यातल्या त्यात तुम्ही कुठे नोकरी,व्यवसाय करत असाल तर,ई मेल ची खूप गरज आणि इमेलाचा वापर करणे अनिवार्य च झालेले आहे असे म्हटले तर वावगे वाटू नये.
जगभरात ई मेल E mail सेवा ही सर्वात जास्त वापरली जाणारी सेवा असून ही सेवा इंटरनेट द्वारे उपलब्ध होते. पूर्वीच्या काळात संदेशवहन करण्यासाठी पत्रव्यवहार केला जात असे परंतु सध्या पत्राचा वापर कमी होऊन ई मेल या सेवेचा वापर खूप वाढलेला आपल्याला ई मेल करता येणे खूप महत्वाचे आहे.त्यासाठी आपल्याला ई मेल म्हणजे काय, ई मेल कसा तयार करायचा हे समजावून घेणे आवश्यक आहे.
ई-मेल ( E mail) म्हणजे काय?
इंटरनेटच्या माध्यमातून कॉम्प्युटर,मोबाईल,टॅबलेट इत्यादी साधनाद्वारे केला जाणारा पत्रव्यवहार किंवा संदेश यालाच ई मेल असे म्हटले जाते.
ई-मेल चे पूर्ण नाव इलेक्ट्रॉनिक मेल आहे.ई मेल ही जगातील सर्वात जलद सेवा असून,जगातील एका कोपऱ्यातून दुसऱ्या को कोपऱ्यांमध्ये सहजपणे संपर्क साधता येतो.
थोडक्यात आपण ज्या प्रकारे कागदावर पत्र लिहून ती पाकीट मध्ये भरून ज्याला पत्र पाठवायचे त्याच्या पत्त्यावर आपण ते पोस्ट च्या सहाय्याने तीन-चार दिवसांमध्ये संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचू केले जाते. परंतु ई-मेल ही सेवा अतिशय सोपी,जलद आणि सुरक्षित संदेश पाठवण्याचे माध्यम असून ही मिली एक खोट मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येणारी सेवा आहे.
ई मेलचा वापर मोठ्या संस्था कंपन्या तसेच जगभरातील विविध संस्था शैक्षणिक क्षेत्रामध्ये बिझनेस,व्यापार इत्यादी सर्वच क्षेत्रामध्ये वापरण्यात येणारी सेवा आहे ई-मेल च्या साह्याने अनेक वेगवेगळ्या प्रकारचे काम आपल्याला करता येणे सहज शक्य झाले आहे.
ई-मेल सेवा देणारी संकेतस्थळे.
- www.gmail.com
- www.hotmail.com
- www.rediffmail.com
वरील संकेत स्थळे मोफत सेवा देणारे आणि जगात सर्वात जास्त वापरण्यात येणारे स्थळे आहेत.आपण (जी मेल) G mail वरून ई मेल कसा लिहावा आणि तो कसा पाठवायचा याबद्दल माहिती घेऊया.
इमेज 1. |
इमेज 2 |
ई मेल कसा करावा।सर्व माहिती मराठीत.
- ई मेल कसा लिहावा।मोबाईल च्या साह्याने ई-मेल पाठवणे.
- सर्वात प्रथम आपण मोबाईल मधील G mail मध्ये जावे.ईमेल मध्ये जाण्यासाठी G mail हे Google चे अधिकृत Android App वापरू शकता,मी तेच वापरतो.
- त्यानंतर पुढे App ओपेन झाल्यावर खालील बाजूला उजव्या कोपर्यात Compose हे option दिसेल त्याठिकाणी पेनावरील चिन्हावर क्लिक करावे.
- पेनावर click केल्यावर आपल्याला वरील इमेज मध्ये दाखवल्याप्रमाणे वेगवेगळे options दिसतील त्याची माहिती पुढिलप्रमाणे.
- From - याठिकाणी तुम्हाला तुमचा स्वत:चा ईमेल आय डी लिहावा लागेल.
- To - याठिकाणी ज्याला ईमेल पाठवायचा आहे त्याचा Email Address लिहावा,याठिकाणी समोर तुमच्या मोबाइल मध्ये असणारे ईमेल पत्ते सुद्धा निवडू शकता,तसेच एकाच वेळी जर अनेकांना ई मेल पाठवयाचा असेल तर तेव्हढे ई मेल पत्ते लिहा,म्हणजे एकाच वेळी अनेकांना ई मेल पाठवला जाईल. E mail address बरोबर लिहला आहे की नाही याची खात्री करा.
- Subject - या ठिकाणी तुम्हाला कोणत्या विषयाशी संबंधित ईमेल पाठवायचा आहे त्याचा विषय लिहा. त्याच्या खाली मोकळी जागा आहे तिथे तुम्ही टाईप करून लिहू शकता.
ईमेल मध्ये फाईल कशी जोडावी?
ईमेल मध्ये तुम्ही वेगवेगळ्या फाईल जोडू शकता आणि पाठवू शकता,त्यासाठी तुम्हाला 🔗 अशा चिन्हावर वरील बाजूला Click करून File Attach करावी लागेल. फाईल Word Document , Excel Spreadsheet ,PDF, PPT Photos इ स्वरुपात पाठवू शकता.File Size ही खूपच मोठी असेल तर ती Attach होत नसते,म्हणून साईज ठराविक साईज मध्येच असावी.
वरील सर्व प्रोसेस झाल्यावर वरील कोपर्यात असलेल्या त्रिकोणी ⊳चिन्हावर क्लिक करून तुम्ही Email सेंड करा. तुमचा ईमेल समोरच्या व्यक्तीला पाठवला जाईल.