Table of content(toc)
बैलपोळा 2023 : भारतामध्ये वेगवेगळे सण साजरे केले जातात. भारतामध्ये सर्व लोक एकत्रित सण उत्सव साजरे करून त्याचा आनंद घेत असतात. त्यामुळे भारतामध्ये विविधतेतून एकता आढळून येते.
जगामध्ये भारत हा असा देश आहे की या देशामध्ये निसर्ग, प्राणी, तसेच इतर निर्जीव वस्तूंची सुद्धा पूजा केली जाते, त्या पाठीमागचे कारण म्हणजे मानवी जीवनात या सर्व गोष्टींचा उपयोग होतो. तसेच जीवन जगताना मानवाला या सर्व गोष्टी आवश्यक असतात.
तसेच उदाहरण घेतले तर नागपंचमी, वटपौर्णिमा इत्यादी असे वेगवेगळे सण साजरे केले जातात. त्यांचे महत्त्व कळावे आणि त्याचे जीवनातील उपयोग समजावा यासाठी या सर्व गोष्टी विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वेगवेगळे पारंपारिक सण साजरे केले जातात.
हे सुद्धा वाचा :दिवाळी भाऊबीज सणाची मराठी माहिती.
बैल पोळा सणाचे महत्व
हे सर्व सण साजरे करण्यामागे महत्त्वाचा उद्देश म्हणजे मानवी जीवनात त्याचे असलेले स्थान आणि महत्त्व याविषयी जागरूकता निर्माण होण्याचे दृष्टीने हे सण साजरे केले जातात. त्यामध्ये बैलपोळा हा एका सण आहे, ज्या सणाला भारतामध्ये बैलांची पूजा केली जाते. कारण बैल हा प्राणी शेती कामासाठी खूप उपयुक्त असून बैलाला शेतीतील काम करून घेण्यासाठी उपयोगी पडतो. बैलगाडी, नांगरणी, पेरणी तसेच इतर कामासाठी वापरले जाते.
वर्षभर त्याच्याकडून शेतामध्ये काम करून घेतले जाते. त्याच्याविषयी आदर आपुलकी आणि प्रेम तसेच त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा हा सण साजरा केला जातो.
बैल पोळा सन कसा साजरा करतात पूजा विधी ?
बैल पोळा या सणाच्या दिवशी सकाळी बैलांना चारायला घेऊन जातात. नदीवर आंघोळ घालतात. त्यानंतर त्यांच्या शिंगाना रंग लाऊन,गोंडे ,गळ्यात तोडे,घुंगरे,पायात घुंगरे आणि पाठीवर रंगी बेरंगी झूल घालतात.
जसे वाटते कि या दिवशी बैलांचे लग्न आहे. त्यामुळे असा समज आहे कि या दिवशी बैलांचे लग्न असते. या दिवशी बैलांना गोडधोड खायला घालून त्याची संध्याकाळी ढोल ताशांच्या गजरात गावात एकत्रित मिरवणूक काढली जाते याला पोळा फुटला असेही म्हणतात.
गावातील मारुती मंदिराचे दर्शन घेऊन आल्यावर बैलांना शेतकरी आपल्या दारात पत्नी,व इतर कुटुंबियांसोबत बैलांची गोड धोड पदार्थ खायला घालून पाय धुतात हळद कुंकू लावून पूजा करतात. तसेच त्याच्या कष्टान्विषयी कृतज्ञता व्यक्त करून आभार मानतात.