5 सप्टेंबर : शिक्षक दिन माहिती मराठी।Teachers Day Information In Marathi

Teachers Day शिक्षक दिन विषयी माहिती -वाचन मित्र.

Teachers Day : Dr. Sarvepalli Radhakrishnan -Teachers Day Information In Marathi डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करतात. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् हे भारताचे राष्ट्रपती होते.भारतात पहिल्यांदा 5 सप्टेंबर 1962 रोजी शिक्षक दिवस साजरा करण्यात आला होता.


डॉक्टर राधाकृष्णन,5 सप्टेंबर शिक्षक दिन

शिक्षक दिन वृत्तांत लेखन.

डॉ.राधाकृष्णन हे एक आदर्श शिक्षक होते.शिक्षक हे बाल मनाला योग्य आकार देण्याचे काम करतो आणि परिपूर्ण व्यक्ती व देशाचा आधार स्तंभ निर्माण करण्याचे कार्य करतो.त्यामुळे शिक्षक हा गुणवंत,प्रतिभा संपन्न आणि आदर्श व्यक्ती असावा.


डॉक्टर राधाकृष्णन यांचा जन्मदिवस 5 सप्टेंबर या दिवशी असतो. शिक्षक हा सामाजाचा निर्माण कर्ता आहे. समाजाचे परिवर्तन करण्याचे कार्य शिक्षकाला असतो करण्यासाठी शिक्षक मोलाची भूमिका बजावतात. डॉक्टर राधाकृष्ण यांनी म्हटले आहे या देशांमध्ये निस्वार्थी,निरपेक्ष ,सेवावृत्तीने कोणतेही एखादे कार्य होते.

Join : Whats App Channel

तेव्हा या साठी शिक्षक पात्र असतो.शिक्षकाला गुरूच्या स्थानी मानले जाते.गुरूने आपल्याकडील ज्ञान देणे,ही अपेक्षा समाजाची गुरूकडून असते.मातीच्या गोळ्याला आकार देण्याचे म्हणजे शाळेत येणारे मूल हे मातीच्या गोळ्या प्रमाणे असते.त्याला आपण जसा आकार देतो,घडवतो त्या प्रकारे तो आकार धारण करतो,म्हणून शिक्षक हे लहान मुलांना आकार देण्याचे काम करतात.म्हणून शिक्षकाची भूमिका खूप महत्वाची असते.


ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले,शाहू,आंबेडकर,महात्मा फुले इत्यादी महान व्यक्तींनी सुद्धा शिक्षण क्षेत्रात आपले जीवन वाहून नेले त्यांचे कार्य सुद्धा आपण विसरून चालणार नाही.सावित्रीबाई फुले यांनी भारतात महिलाना शिक्षण मिळावे म्हणून महान कार्य केलेले आहे.म्हणून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पहिल्या स्री शिक्षिका असे म्हणतात. 


शिक्षकांना आपली भूमिका बजावताना अनेक गोष्टी चे भान ठेवावे लागते कारण ते मुलांसमोर एक आदर्श असतात.शिक्षक हे मुलांना प्रेरणा देण्याचे काम करतात.शिक्षकांचे ज्ञान हे अद्ययावत असावे.शिक्षकांनी सध्याची बदलत चाललेली परिस्थिती लक्षात घेता आपल्या अध्ययन अध्यापन यात वेळोवेळी बदल करून आपल्या व विद्यार्थ्याच्या ज्ञानात भर पाडण्याचे कार्य करावे.


5 सप्टेंबर शिक्षक दिन Teachers Day का साजरा केला जातो.

शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून,तो ज्ञानदानाचे पवित्र कार्य,अविरतपणे,निस्वार्थीपणे पार पाडत असतो,5 सप्टेंबर शिक्षक दिन या दिवशी शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांच्या कार्याचा गुणगौरव  केला जातो,म्हणून 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन Teachers Day म्हणून साजरा केला जातो. 


शिक्षक दिन शाळेत कसा साजरा केला जातो.

शिक्षक दिनाच्या दिवशी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या जयंतीनिमित्त शाळेत त्यांच्या प्रतिमेला फुलाचा हार,गुलाल, व फुले वाहून त्यांची जयंती साजरी केली जाते. डॉ.राधाकृष्णन यांच्या कार्याची माहिती व शिक्षक दिनानिमित्त भाषण केले जातात.


शिक्षक दिन असल्याने या दिवशी शिक्षकांचा गौरव केला जातो.सर्वत्र शिक्षकांना फुलाचा गुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला जातो.त्यांचे गुणगान केले जाते.काही ठिकाणी शिक्षक दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.शिक्षक यांच्या कार्याचे गुणगान गायले जाते.


हे वाचा : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जीवन परिचय


शाळा महाविद्यालये या ठिकाणी शिक्षक दिनाच्या दिवशी शिक्षकांना त्या दिवशी विश्रांती मिळावी म्हणून शाळेतील मुले किंवा मुली शिक्षक होतात.शिक्षकांची भूमिका पार पाडतात. 


आमच्या शाळेत सुद्धा शिक्षक दिनाच्या दिवशी आम्ही आमच्या शाळेतील शिक्षकांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आदर करून त्यांना त्या दिवशी विश्रांती मिळावी म्हणून शिक्षकांची भूमिका पार पाडली होती.आमच्या शिक्षकांची भूमिका पार पाडण्यासाठी मुले आणि मुली यांनी वेगवेगळ्या विषयावर शाळेमध्ये तासिका घेतले होते. मुलींनी शिक्षिकेसारखे साड्या परिधान करून शिक्षिकेच्या भूमिकेत एक दिवस शाळेमध्ये काम केले होते.


विषयानुसार वेगवेगळ्या तासाला त्या त्या विषयाचे तास घेतले होते.शिक्षकाची भूमिका किती जबाबदारी आणि विद्यार्थ्यासाठी किती महत्वाची असते आम्हाला त्यामुळे समजले होते.


शिक्षक हे पुस्तक ज्ञानाबरोबरच बाहेरील जगाचे ज्ञान देतात.आई वडील हे आपले पहिले गुरू आणि शिक्षक हे दुसरे गुरु असून त्यांना मान ,सन्मान व आदर मिळणे आवश्यक आहे.शिक्षक हे आपल्याला पुस्तकी ज्ञान देतात त्याचबरोबर मूल्यशिक्षण सुद्धा देतात.म्हणून प्रत्येक व्यकीला यश मिळण्यात आपल्या गुरूचा वाटा निश्चित असतो.


डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचे प्रेरणादायी विचार. 

भविष्यात येणार्‍या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना खर्‍या अर्थाने घडवतो ,तोच खरा शिक्षक - डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन


जो संपूर्ण आयुष्यभर शिकत राहतो,तसेच आपल्या विद्यार्थ्याकडून एखाई गोष्ट शिकण्यासही त्याला कमीपणा येत नाही ,तो एक उत्तम शिक्षक असतो. - डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन


जेव्हा आपल्याला वाटत,आपल्याला सारे ठाऊक आहे ,तेव्हा आपण शिकन थांबवतो. - डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन


अशा प्रकारे आपण 5 सप्टेंबर शिक्षक दिन व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या जयंतीनिमित्त माहिती घेतली.शिक्षक दिन कसा साजरा केला जातो.शाळेत मुलांना शिक्षक दिन बातमी लेखन मराठी करावी लागते,त्यासाठी ही माहिती उपयोगी पडेल. 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने