Mahajyoti Updates : महाज्योती तर्फे MHT-CET JEE NEET साठी ऑनलाईन प्रशिक्षण पात्र विद्यार्थ्यांना मोफत टॅब मिळणार

महाज्योती (Mahajyoti) तर्फे MHT-CET JEE NEET साठी ऑनलाईन प्रशिक्षण पात्र विद्यार्थ्यांना मोफत टॅब मिळणार..

महाज्योती तर्फे MHT-CET JEE NEET साठी ऑनलाईन प्रशिक्षण पात्र विद्यार्थ्यांना मोफत टॅब मिळणार

Table Of Content :

Table Of Content(toc)

Mahajyoti Updates : राज्यातील इतर मागासवर्गीय भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरता महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती यांच्यातर्फे 2025 मध्ये होणाऱ्या MHT-CET JEE NEET या प्रवेश परीक्षांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाणार आहे.



यासाठी पात्र विद्यार्थ्यांना येथे 31 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरायचा असून, प्रशिक्षणासाठी महाज्योती तर्फे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मोफत टॅब आणि दर दिवसाला 6GB इंटरनेट डाटा पुरविण्यात येणार आहे. अशी माहिती महाज्योती चे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी दिली.

राज्यातील इतर मागासवर्गीय भटके विमुक्त जमाती तसेच विशेष मागास वर्गातील विद्यार्थ्यांकडून एमएचटी-सीईटी जेईई नीट 2025 करता पूर्व प्रशिक्षण योजना लागू आहे. या अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवले आहेत.


Mahajyoti :आवश्यक अटी आणि शर्ती 

  • यात राज्यातील रहिवासी असलेल्या विद्यार्थ्यास अर्ज करता येईल.
  • इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग यापैकी विद्यार्थी असणे गरजेचे आहे.
  • उमेदवार हा नॉन क्रिमिलेयर गटातील असावा.
  • जे विद्यार्थी हे 2023 मध्ये दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत ते अर्ज करण्यास पात्र राहतील.
  • पात्र विद्यार्थ्यांना अर्ज करताना अकरावी विज्ञान शाखेचे प्रवेश पत्र, बोनाफाईड सर्टिफिकेट आणि दहावीची गुणपत्रिका अन्य आवश्यक कागदपत्रे जोडणे गरजेचे आहे.
  • विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेत प्रवेश घेणे अपेक्षित आहे.


Mahajyoti : अर्ज करण्याची प्रोसस

  • महाज्योती च्या https://mahajyoti.org.in/en/home/ संकेतस्थळावर सूचनाफलक नोटीस बोर्ड या पर्यायात जाऊन एप्लीकेशन फॉर एमएचटी सीईटी जेईई नीट 2025 या ठिकाणी भेट द्यावी. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
  • त्यानंतर अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे साक्षांकित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून अपलोड करणे गरजेचे आहे.
  • अर्ज करताना विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये म्हणून महाज्योतीतर्फे कॉल सेंटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
  • विद्यार्थ्यांनी 0712 287012021 या नंबर वर संपर्क करावा. इमेल - [email protected] वर संपर्क करावा तसेच अधिकृत साईट ला भेट द्यावी.

तालिका उदाहरण
आमचे Whats App ग्रुप जॉईन करा येथे क्लिक करा
पदभरती,नोकरी जाहिरात क्लिक कर
सरकारी योजना क्लिक कर
वाचन मित्र क्लिक कर
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने