Mahajyoti Tablet Yojana : मोफत टॅब आणि MHT- CET / JEE / NEET प्रशिक्षणासाठी अर्ज करण्यास आता मुदतवाढ, शेवटची संधी सोडू नका...
Mahajyoti Tablet Yojana Registration : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (MAHAJYOTI) मार्फत राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी MHT- CET/JEE/NEET 2025 च्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या परिक्षेच्या पूर्व तयारीसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षणासाठी मोफत टॅब आणि प्रशिक्षण घेता येणार आहे.
महाज्योती या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेकडून MHT-CETJEE / NEET 2025 परीक्षेच्या मोफत ऑनलाईन पूर्व तयारीसाठी इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने दिनांक 31 मार्च 2023 पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. मात्र पुन्हा MHT-CETJEE/NEET 2025 पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज मागविण्याकरिता 5 जूलै 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. संपूर्ण माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
Mahajyoti Yojana काय आहे?
MAHAJYOTI : महात्मा ज्योतीबा फुले यांचे आधुनिक समाजाचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी महाराष्ट्र शासनाने इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग या कमकुवत घटकांच्या सर्वसमावेषक सर्वांगीण शास्वत विकासाकरीता महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजे महाज्योती या स्वायत्त संस्थेची स्थापना 8 ऑगस्ट 2019 या दिवशी करण्यायात आली. या संस्थे मार्फत विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात.
महाज्योती मोफत टॅब योजना काय आहे?
Mahayoti Free Tab योजना ही महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती , विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातीत विद्यार्थ्यांसाठी MHT- CET/JEE/NEET 2025 करीता पूर्व प्रशिक्षण करिता आहे.
महाज्योती मोफत टॅब आणि दिवसाला 6 GB डेटा फ्री
महाज्योती योजने अंतर्गत मोफत टॅब योजनेसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. महाज्योती मार्फत MHT-CET/JEE/NEET परिक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यात येते. तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योतीतर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 GB Day इंटरनेट डाटा पुरविण्यात येणार आहे.
महाज्योती मोफत टॅब योजनेसाठी आवश्यक पात्रता
🔰 उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
महाज्योती योजना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
MHT-CET/JEE/NEET 2025 पूर्वप्रशिक्षणाकरीता ऑनलाईन नोंदणी अर्ज कसा करावा?
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ( महाज्योती), नागपूर या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेकडुन MHT-CET/JEE / NEET 2025 परीक्षेच्या MHT-CET / JEE / NEET 2025 या परिक्षेच्या मोफत ऑनलाईन पूर्व तयारीसाठी OBC / VJNT / SBC या संवर्गातील इच्छुक व पात्र उमेदवारांकडुन ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
Mahajyoti Tablet अर्ज करण्यासाठी खालील लिंक देण्यात आली आहे.
महाज्योती ऑनलाईन अर्ज करताना या गोष्टी लक्षात ठेवा.
🔰पोस्टाने अथवा इमेल च्या सहाय्याने अर्ज स्वीकारले जात नाही, फक्त ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील.
🔰जाहिरातीमध्ये बदल करण्याचे अधिकार व्यवस्थापकीय संचालक महाज्योती यांचे राहतील.
🔰अर्ज करताना अडचण आल्यास महाज्योती च्या Call center ला संपर्क करावा- 0712-2870120/21.
नवीन नवीन पोस्ट्स मिळवण्यासाठी आमचा What's app group join करा.