15 ऑगस्ट पासून राज्यातील सरकारी रुग्णालयामध्ये मिळणार मोफत उपचार..
Free Treatment in Government Hospital : राज्यातील सरकारी रुग्णालयामध्ये 15 ऑगस्ट पासून मिळणार मोफत उपचार ! राज्यातील प्रत्येक नागरिकांना चांगले आरोग्य मिळावे यासाठी राज्य शासन वेगवेगळी प्रयत्न करत असते. आता शासनाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला असून; शासकीय रुग्णालयातून नागरिकांना मोफत उपचार देण्यासाठी राज्य शासनाने निर्णय घेतला आहे.
हे सुद्धा वाचा : MJPJAY 2023 Updates : महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत आता मिळणार 5 लाखांपर्यंत आरोग्य संरक्षण कवच, शासन निर्णय जारी..
दिनांक 28 डिसेंबर 2015 च्या शासन निर्णयानुसार सर्व शासकीय रुग्णालयात रुग्णांना पुरवण्यात येत असलेल्या वैद्यकीय सेवा तपासणी आणि त्याबाबत शुल्क निश्चित करण्यात आले होते.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये 15 ऑगस्ट पासून सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा नागरिकांना मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.#FreeHealthServices #mahahealth #arogyavibhag pic.twitter.com/avsLDdhwt4
— Maha Arogya IEC Bureau (@MahaHealthIEC) August 12, 2023
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉक्टर तानाजी सावंत यांच्या प्रयत्नांना यश आले असून, त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील दुर्बल घटक आणि गोरगरीब याचा चांगला फायदा मिळणार आहे. ही सेवा राज्यात 15 ऑगस्ट 2023 पासून सुरू होणार आहे.
आयुष्यमान भारत योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजना या महत्वकांक्षी योजनेमध्ये पाच लाख रुपये पर्यंतच्या खर्चाची हमी यापूर्वीच शासनाने घेतली असून, राज्यातील नागरिकांना वैद्यकीय खर्चाचे कवच उपलब्ध करून देण्यात आले आहे.
आमचे Whats App ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
पदभरती,नोकरी जाहिरात | क्लिक करा |
सरकारी योजना | क्लिक करा | वाचन मित्र | क्लिक करा |