विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी।Caste Validity Certificate मिळणार आता ऑनलाईन लगेच करा अर्ज!

Caste Validity Certificate Online मिळण्यासाठी करा आता ऑनलाईन अर्ज!

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी।Caste Validity Certificate मिळणार आता ऑनलाईन लगेच करा अर्ज!
Caste Validity Certificate

Caste Validity Certificate Online Apply: उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी म्हणजे महाविद्यालयीन प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट ची गरज पडते त्याशिवाय महाविद्यालयामध्ये प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जात नाही तसेच इतर अनेक ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मागितले जाते आता सर्टिफिकेट ऑनलाईन अर्ज करून आपण अगदी सहज मिळू शकतात त्यासाठी खालील प्रमाणे प्रोसेस करावी लागेल.

Caste Validity Online Certificate साठी अर्ज कुठे आणि कसा करायचा?

जातीचा दाखला मिळवण्यासाठी आवश्यक पूर्तता खालीलप्रमाणे करावी. विद्यार्थ्यांना https://bartievalidity.maharashtra.gov.in/register.php या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज सादर करावा लागेल. त्यासाठी अर्ज भरताना अचूक माहिती भरणे आवश्यक आहे.

 तसेच त्यासोबत आवश्यक ते काळजीपूर्वक कागदपत्रे अपलोड करणे. त्यानंतर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ऑनलाईन प्रिंट घेणे आवश्यक असते. 

जात प्रमाणपत्र काढण्यासाठी https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ हे सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर प्रिंट आऊट्स विद्यार्थ्यांनी इतर आवश्यक कागदपत्र घेऊन मूळ प्रत घेऊन त्यांच्या जिल्ह्यातील जात पडताळणी समिती कार्यालयात प्रत्यक्ष घेऊन जावे लागते.

त्यानंतर समिती कार्यालयाकडून कागदपत्राची पडताळणी करून योग्य कागदपत्राची पूर्तता केली असल्यास पंधरा दिवसात वैद्यता प्रमाणपत्र मिळते. मात्र काही प्रस्तावामध्ये अडचण आढळून आल्यास सहा महिन्याचा कालावधी सुद्धा लागू शकतो.

जात वैधता (Caste Validity ) प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे.

अर्जदाराचे आधार कार्ड 

अर्जदाराचे रेशन कार्ड 

अर्जदाराच्या वडिलांचे आधार कार्ड, रेशन कार्ड 

अर्जदारांच्या आजोबांची शाळा सोडल्याचा दाखला - शैक्षणिक कागदपत्रे नसल्यास 1960 पूर्वीचे खरेदीखत, सातबारा, फेरफार इतर कागदपत्रे आवश्यक असतात.

 मुख्याध्यापक बोनाफाईड 

तहसील कार्यालय कडून वंशावळी व कागदपत्राच्या सत्यतेबाबत दोन प्रतिज्ञापत्र सादर करावे लागतात.

आमच्या What's App ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर जावे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने