राजमाता जिजाऊ यांची संपूर्ण मराठी माहिती.

राजमाता जिजाऊ यांची माहिती. 


राजमाता जिजाऊ यांची संपूर्ण मराठी माहिती.
राजमाता जिजाऊ जयंती माहिती.


राजमाता जिजाऊ या स्वराज्य घडवणाऱ्या स्पुर्तीच्या एक मूर्ती होत्या. छत्रपती शहाजी राजे यांच्या वीर पत्नी होत्या. तसेच राजमाता जिजाऊ या जाधव घराण्यातील लाडकी मुलगी होती. राजमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आई होत्या. राजमाता जिजाऊ यांना स्री शक्तीचे प्रतिक मानले जाते, त्यांनी शिवाजी महाराज यांना घडवले म्हणून त्या एक आदर्श माता होत्या.


राजमाता जिजाऊ यांचा परिचय:

राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 मध्ये सिंदखेड राजा ,बुलढाणा येथे झाला. राजमाता जिजाऊ यांच्या वडिलांचे नाव लखुजी जाधव होते. आईचे नाव म्हाळसाबाई होते. जाधव हे देवगिरी च्या यादव घराण्याचे वंशज होते. डिसेंबर इ.स.1605 मध्ये जिजाबाई यांचा शहाजीराजे यांच्याशी दौलताबाद येथे विवाह झाला.


बालसंगोपन आणि राज्यकारभार:

पुण्याची जहागीरीची जबाबदारी शहाजी राजा यांनी जिजाबाई यांच्यावर शिवाजी महाराज 14 वर्षाचे असताना सोपवली होती. आदिलशाही आणि निजामशाही यांनी पुण्याची अवस्था खूप वाईट केली होती. अशा परिस्थितीत त्यांनी खचून न जाता दादोजी कोंडदेव यांच्या सहकार्याने पुणे शहराला नवजीवन देण्यासाठी प्रयत्न सुरु केले. स्थानिक लोकांना उभय दिले मुस्लीम राजवटीविरुद्ध बळ निर्माण केले. 


शिवाजी महाराजांना घडवले बालवयात त्यांनी शिवराय यांना चांगले संस्कार दिले, राज्यकारभार करण्यास बळ दिले, रामायण ,महाभारत यातील गोष्टी सांगून त्यांना एक शूरवीर बनवले. त्यांच्या मनावर राजनीती बिंबवली,राजकीय डावपेच शिकवले.


समान न्याय आणि अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी कठोर शिक्षा अवलंब केला, जिजामाता या एक लढाऊ आणि कठोर परिस्थितीत मार्ग काढनाऱ्या आणि समाजात जागरुकता निर्माण करणाऱ्या एक थोर समाजसुधारक देखील होत्या.


राजमाता जिजाऊ याचा मृत्यू:

शिवाजी राजे यांचा राज्यभिषेक आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून राज्यभिषेक झाल्यावर 12 दिवसांनी 17 जून 1674 रोजी त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 80 व्या वर्षी वृद्धापकाळाने रायगड च्या पायथ्याशी पाचाड या गावी त्यांचे निधन झाले. त्या गावी त्यांची समाधी आहे.


जिजाबाई हि आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान ,चारित्र्य,चातुर्य,संघटन व पराक्रम अशा राजस आणि सत्त्वगुणाचे बाळकडू देणाऱ्या राजमाता आहेत.


वाचा: 

ताज्या बातम्या..

करिअर संधी..

पदभरती..

शैक्षणिक बातम्या..

सरकारी योजना..

शासन निर्णय..


नवीन नवीन पोस्ट्स मिळवण्यासाठी आमचा What's app group join करा.


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने