Online Attendance for Students : राज्यातील 1 ली ते 10 वीच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची नोंदणी होणार ऑनलाईन !

Online Attendance for Students

Online Attendance for Students : राज्यातील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे, 1 डिसेंबरपासून अंमलबजावणी होणार आहे. स्विफ्टचॅट या उपयोजनाद्वारे विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवली जाणार आहे.

$ads={1}
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी अनुदानित आणि अंशत: अनुदानित शाळांतील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि राज्यातील शिक्षण क्षेत्रातील माहिती संकलन आणि विश्लेषण प्रक्रिया अधिक वेगवान, सोपी होण्यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेतर्फे पुण्यात विद्या समीक्षा केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे.

$ads={2}
विद्यार्थ्यांची दैनिक उपस्थिती ऑनलाइन नोंदवण्यासाठी अटेन्डन्स बॉटच्या वापराचे प्रशिक्षण विभाग, तालुका, केंद्र स्तरावरील शिक्षकांना देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक प्रदीपकुमार डांगे यांनी या विद्यार्थ्यांची उपस्थिती ऑनलाइन नोंदवण्याबाबतचे निर्देश परिपत्रकाद्वारे दिले.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने