गुंतवणूक: गुंतवणुकीचे प्रकार व फायदे, विविध पर्याय.

गुंतवणूक पर्याय।गुंतवणूक कुठे व कशी करावी.


गुंतवणूक पर्याय।गुंतवणूक कुठे व कशी करावी।Investment Information In Marathi
Investment


गुंतवणूक कुठे करावी आणि आपल्याकडे असणार्‍या पैशाची गुंतवणूक कशी करावी हा सर्वसामान्य लोकांना पडणारा एक महत्वाचा प्रश्न आहे,कारण आपली रक्कम सुरक्षित राहणे व तिचा परतावा ही व्यवस्थित मिळणे आवश्यक असते,म्हणून आपल्याकडे असणारे पैसे गुंतवणूक योग्य ठिकाणी होणे आवश्यक असते. 


पैसे गुंतवणुकीचे विविध प्रकार.

पैसे गुंतवणूक करण्यासाठी सध्या अनेक पर्याय उपलब्ध असून,आपण जर आपली रक्कम सुरक्षित राहावी असे वाटत असेल तर आपल्याला परतावा कमी मिळेल.परंतु गुंतवणुकीमध्ये जर रिस्क घेऊन गुंतववूक केली तर गुंतवलेल्या रकमेवर परतावा चांगल्या प्रकारे मिळतो,परंतु तुमची मुद्दल सुरक्षित नसते.म्हणजे आपण आपल्याकडे असणारी रक्कम जर योग्य ठिकाणी गुंतवली तर परतावा ही मिळतो आणि रक्कम सुरक्षित राहते. 


गुंतवणूक ही भविष्यात उपयोगी पडण्यासाठी,अगोदरच केलेले पूर्वनियोजन होय,आपल्याला भविष्यात काही महत्वाचे खर्चिक व सुधारणात्मक ध्येय पूर्ण करण्यासाठी पैसे अथवा मालमत्ता यांची गुंतवणूक करणे फायद्याचे ठरत असते.गुंतवणूक ही बचत करण्याची पुढील पायरी आहे.गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही विविध पर्याय वापरू शकता.


त्यामध्ये सध्या अनेकजण Stocks Investments ,Mutual Funds Investments, Gold Investments, Real estate Investments ,Bonds Investments यापेक्षा इतरही काही सुरक्षित गुंतवणूक करण्याचे प्रकार आहेत,आपण केलेली इनव्हेस्टमेंट ही सुरक्षित असली पाहीजे.हे तेवढेच महत्वाचे आहे.तुम्हाला गुंतवणूक करून जास्तीत जास्त लाभ कोणत्या ठिकाणी होऊ शकेल याचा अभ्यास करणे अपेक्षित असते.


आता वर्तमानात केलेली investment ही भविष्य सुरक्षित करत असते हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.गुंतवणूक करताना मालमत्ता,वेळ,ऊर्जा,प्रयत्न,योग्य मार्गदर्शन इत्यादी गोष्टी आवश्यक असतात.गुंतवणूक नेहमी आपण आपल्याला भविष्यात अधिक फायदा होईल या दृष्टीने केली जाते.


गुंतवणूक करत असताना पहिला मुद्दा येतो तो म्हणजे जोखीम होय.गुंतवणूक करण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत,परंतु आपली मालमत्ता सुरक्षित राहावी असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सुरक्षित आणि कमी जोखमीची गुंतवणूक पर्याय अवलंबवणे फायद्याचे ठरेल असे वाटते.यात तुम्हाला परतावा कमी मिळतो परंतु तुमची मुद्दल ही सुरक्षित राहते. 


याउलट अति जोखमीची गुंतवणूक केल्यास तुम्हाला मिळणारा परतावा किंवा मोबदला हा खूप जास्त असतो.परंतु तुमची Investment ही धोक्यात असते,त्यात तुम्ही फसवू शकता.अति जोखमीची गुंतवणूक ही 

 

साधली तर शिकार ,नाहीतर भिकार.


अशा प्रकारची असते.म्हणून गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या या प्रश्नाचे उत्तर प्रथम शोधणे व त्याचा अभ्यास करणे आवश्यक असते. 


स्थिर परतावा देणारी गुंतवणूक.

स्थिर परतावा देणारी गुंतवणूक या पर्यायात तुम्ही जसे शासकीय।सरकारी बँकेत  रक्कम fixed deposit फिक्स डिपोजीट करणे,Public Provident Fund पब्लिक प्रोविडेंट फंड,National Savings Certificate नॅशनल सेव्हिंग सर्टीफिकेट,Recurring Deposit रिकरिंग डिपोजीट, अशा प्रकारच्या गुंतवणुकीत जोखीम कमी असते. यात केलेली Investment बर्‍यापैकी सुरक्षित असू शकते.परंतु यात परतावा हा कमी प्रमाणात मिळतो. चालू बँक खात्यात बचत ठेवी,पोस्ट खात्यातील विविध बचत योजना याद्वारे आपण गुंतवणूक करून अधिक नफा मिळवू शकता.

 


आपण आपल्या दैनंदिन जीवनात रोज वेगवेगळे उत्पादने वापरत असतो,या उत्पादन निर्माण करणार्‍या कंपन्या या शेअर्स विकून भांडवल जमा करतात. यालाच स्टॉक एक्स्चेंज असेही म्हणतात.यात गुंतवणूक करायची असेल तर शेअर मार्केट चा अभ्यास करणे आवश्यक असते. यामध्ये आपण कमी जोखीम Stock exchange  असलेले आणि High risk investment जास्त जोखमीचे पर्याय निवडू शकता.यात आपण Mutual Funds हा पर्याय सुधा वापरू शकता. 


भारतीय लोकांचा सर्वात जास्त आवडता गुंतवणुकीचा पर्याय म्हणजे स्थावर मालमत्ता।रियल इस्टेट real estate होय.काही लोक Investing in the stock market शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्याच्या ऐवजी जमीन,घर,प्लॉट मध्ये पैसे गुंतवणूक करताना आपण पाहतो. 


सोन्यात गुंतवणूक करण्याचा पर्याय हा एक गुंतवणूक करण्याचा चांगला पर्याय आहे,कारण आपण पाहतो आहोत,की सोन्याचे भाव हे कमी होताना दिसत नाहीत,ते वाढतच चालले आहेत.काही लोक आलेल्या पैसे हे थोडे थोडे करून Gold Investment करतात.यात सोने सुरक्षित ठेवणे आवश्यक असते.


तसेच कधी कधी यात धोका पत्करावा लागतो.खरेदी केलेली सोन्याची शुद्धता किती आहे त्यावर त्याची किंमत ठरते.गुंतवणूक कधी करावी गुंतवणूक कुठे करावी गुंतवणूक कशी करावी इत्यादी प्रश्न आपल्या मनात सतत येत असतात,तसेच गुंतवणूक करण्याचे नेमके काय फायदे आहेत हा प्रश्न सुधा महत्वाचा आहे. 


गुंतवणूक करण्याचे फायदे.

  • गुंतवणूक केल्याने आपल्या अनावश्यक खर्च टाळता येतो. 
  • गुंतवणूक योग्य वेळी केली तर भविष्यात आपण मोठी संपत्ती निर्माण करू शकतो. 
  • लवकर गुंतवणूक केल्यास आपण आपले भविष्य आनंदी,सुरक्षित,तसेच तुमच्या पुढील आऊष्यात आधार होऊ शकते. 
  • गुंतवणुकीमुळे आर्थिक बचत करण्याची सवय लागते. 
  • आपल्या आणि आपल्या मुलांच्या पुढील शिक्षण,व्यवसाय,तसेच सुखी कुटुंबासाठी आपल्याला गुंतवणुकीमुळे मदत होते. 
  • गुंतवणूक योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी केल्यास तुमची आर्थिक परिस्थिति सुधारण्यास आणि भविष्यातील अनेक स्वप्ने पूर्ण करण्यास सक्षम होऊ शकता. 


अशा प्रकारे आपण या पोस्ट मध्ये गुंतवणूक पर्याय।गुंतवणूक कुठे व कशी करावी।Investment Information In Marathi या विषयवर माहिती घेतली.या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरूपाची,व महितीस्तव असून गुंतवणूक आपण आपल्या जबाबदारीवर करावी 


वाचा: 

ताज्या बातम्या..

करिअर संधी..

पदभरती..

शैक्षणिक बातम्या..

सरकारी योजना..

शासन निर्णय..


नवीन नवीन पोस्ट्स मिळवण्यासाठी आमचा What's app group join करा.


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने