भारतातील 10 निसर्गरम्य प्रेक्षणीय पर्यटनस्थळे.
भारतातील प्रसिद्धा पर्यटन ठिकाणे व त्यांची माहिती,पर्यटन स्थळांची नावे,भारतातील काही ठराविक पर्यटन स्थळांविषयी माहिती घेऊया.
1.माउंट अबू.
Table Of Content:
Table Of Content(toc)
माउंट अबू मधील काही पाहण्यासारखे ठिकाणे.
दिलवाडा जैन मंदिर माऊंट अबु मधील सर्वात प्रसिद्ध तीर्थ स्थळ आहे.माऊंट अबु मधील नक्की सरोवर हे एक अद्भुत आणि प्रकृतीक दृश्याने भरलेले आणि निसर्गमय ठिकाण आहे.हे मानवनिर्मित पहिले सरोवर असून त्याची खोली सुमारे 11000 मीटर आहे.हे एक Photography करण्यासाठी चांगले ठिकाण आहे.
गुरु शिखर हे अरवली पर्वतातील सर्वात उंच ठिकाण आहे. या ठिकाणी अबु वेधशाळा व गुरु दत्तात्रय गुंफा मंदिर आहे.या ठिकाणी गेल्यावर आपण ढगात आलो आहे असा भास निर्माण होतो.
Mount Abu।माउंट अबू मध्ये गौमुख मंदिर पाहण्यासारखे आहे.
अर्बुदा देवी मंदिर माउंट अबू मध्ये पाहू शकता.माउंट अबू मध्ये रगुनाथ मंदिर तसेच वन्यजीव अभयारण्य,अचलगढ किल्ला,सूर्यास्त बिन्दु,इत्यादि ठिकाणे पाहण्यासारखे आहेत.
माउंट अबू ला फिरायला जाण्यासाठी सर्वात चांगली वेळ जुलै ते फेब्रुवारी या काळात पर्यटक म्हणून जाऊ शकता. Mount Abu ला जाण्यासाठी सडक मार्ग,हवाई मार्ग,तसेच ट्रेन ने सुद्धा जाऊ शकता.
2.Gangatok Hill Station।गंगटोक.
 |
गंगटोक |
गंगटोक मधील काही पाहण्यासारखे ठिकाणे.
गंगटोक हे निसर्गमय आहे कारण तिथे पांढरेशुभ्र आकाश आणि बर्फाने माखलेले शिखरे पाहण्यासारखे आहेत.या ठिकाणी हिमालयच्या पसरलेल्या रंगाचं रांगा पाहताना डोळ्याचे पारणे फिटतात.
गंगटोक मधील एम जी रोड हा विविध खाद्यपदार्थ ,भेटवस्तू,लोकरीचे कपडे,खरेदी करण्यासाठी पसिद्ध आहे. गंगटोक मध्ये असंख्य कोसळणारे धबधबे आहेत,तसेच जंगले आणि नागमोडी वळणे असणारे रस्ते पाहायाला मिळतात.
गंगटोक मध्ये आणि गणेशटोक या ठिकाणावर आल्हाददायक सूर्यकिरणाचा आनंद घेऊ शकता.हे ठिकाण हिमालयाच्या कुशीत लपलेले आहे. गंगटोक ला पर्वतांचे शहर सुद्धा संबोधले जाते."ताशी व्यु पॉईंट" हे याठिकाणी पाहण्यासारखे ठिकाण आहे.या ठिकाणाहून संपूर्ण गंगटोक दिसते.
शहरापासून 7 किमी अंतरावर गणेशटोक आहे. या ठिकाणी गणेशाची अष्टकोनि मूर्तिचे प्राचीन मंदिर आहे. गंगटोक मध्ये सोमगो तलाव ,लम्पोखरी तलाव,रूमटेक मठ,दो द्रुल चोर्टेन,बाबा मंदिर,बनझंकारी धबधबा प्रसिद्ध आहे.
कांचनगंगा पर्वताचे शिखर पाहण्यासाठी या ठिकाणी विशेष महत्व आहे, गंगटोक या ठिकाणी पर्यटक म्हणून तुम्ही फेब्रुवारी ते मे आणि सप्टेंबर ते डिसेंबर हा कालावधी चांगला आहे. या ठिकाणी जाण्यासाठी तुम्ही विमानाने तसेच रेल्वेने सुद्धा जाऊ शकता.
3. Uti Hill Station।ऊटी.
 |
उटी |
उटी मधील पाहण्यासारखे ठिकाणे.
बादीपूर नॅशनल पार्क टायगर रिझर्व नॅशनल पार्क.
मदुमलाई नॅशनल पार्क हे वाघांसाठी प्रसिद्ध असून सरकारने हे वाघांसाठी संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. तसेच या ठिकाणी हत्ती, जंगली कुत्रे ,चितळ इत्यादी पशू ,पक्षी आढळून येतात.
उटी पासून मैसूर रोडवर 45 किलोमीटर अंतरावर मदुमलाई नॅशनल पार्क आहे. याठिकाणी आशियाई हत्ती, सांबर, हरीण इत्यादी जंगली प्राणी पाहण्याचा आनंद घेऊ शकतात.
कलहटी धबधबा.
उटी पासून 14 किलोमीटर अंतरावर कलहटी धबधबा पाहण्यासारखे ठिकाण आहे. हा धबधबा 100 फूट उंच वरून वाहतो. कुन्नूर ते उटी पासून ते तीस किलोमीटर अंतरावरील एक पाहण्यासारखे चांगले ठिकाण आहे. याठिकाणी निसर्गरम्य आणि सुंदर देखावे पाहण्यासारखे असतात.
दोडाबेट्टा शिखर
दक्षिण भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर आहे हे केवळ उटी पासून दहा किलोमीटर अंतरावर आहे. उटी मध्ये राहण्यासाठी व फिरण्या साठी वेगवेगळ्या सुविधा असून त्या ठिकाणी भारतातीलच नाही तर जगभरातून पर्यटक येतात. या ठिकाणी वेगवेगळ्या बॉलिवूड तसेच फिल्मी क्षेत्रातील लोकांची रहदारी शूटिंगमुळे असते.
उटी हे हिल स्टेशन युनेस्कोच्या जागतिक वारसा पर्वतीय रेल्वेसाठी देखील प्रसिद्ध आहे. हे अनेक बॉलीवूड चित्रपट आणि प्रादेशिक चित्रपटांसाठी शूटिंगचे ठिकाण आहे. तसेच हे भारतातील एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. ऑक्टोबर-डिसेंबर हा या काळात तुम्ही याठिकाणी पर्यटनासाठी जाऊ शकता.
4.Nainital Hill Station.
 |
नैनिताल |
नैनिताल हिल स्टेशन.
नैनिताल हे हिल स्टेशन उत्तराखंड राज्यातील समुद्रसपाटीपासून 2,084 मीटर उंचीवर आहे.उत्तराखंड राज्यातील नैनिताल जिल्ह्यातील नैनिताल हे एक पर्यटन क्षेत्र म्हणून ओळखले जाते. नैनिताल हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे.नैनिताल ला लेक डिस्ट्रिक असेही म्हटले जाते.
नैनिताल सरोवर चारही बाजूंनी पर्वतांनी वेढलेले असून नैनिताल हे तीन बाजूंनी घनदाट झाडांची सावली मध्ये व पर्वताच्या पायथ्याशी वसलेले आहे.नैनिताल तलाव पाहण्यासारखा आहे.
नैनिताल मध्ये पाहण्यासारखे काही ठिकाणे.
नैनी देवीचे मंदिर.
नैनी देवीचे मंदिर नैनितालच्या उत्तर बाजूला असून 1880 मध्ये भूस्खलन झाले त्यामध्ये हे मंदिर उध्वस्त झाले. नंतर त्याची पुनर्बांधणी करण्यात आली.या मंदिराला विशेष पौराणिक महत्त्व आहे.
नैनिताल तलावात बोटिंगचा आनंद घेऊ शकता. पाण्यात आजूबाजूला असणाऱ्या झाडांचे व पर्वतांचे प्रतिबिंब सुंदर आणि मनमोहक दिसते आणि तलाव हे एक पर्यटकांचे आकर्षक आकर्षण आहे.तल्लीताल व मल्लीताल नैनीताल हे खूप पाहण्यासारखी ठिकाणे आहेत तलावाच्या दोन्ही बाजूने रस्ते आहेत.
मॉल रोड.
मॉल रोड येथे विविध हॉटेल्स ,रेस्टॉरंट आणि दुकाने तसेच वेगवेगळ्या बँका देखील आहेत.हा रस्ता पर्यटकांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे.मॉल रोड हा मल्लीताल व तल्लीताल यांना जोडणारा मुख्य रस्ता आहे.
रोप-वे.
या ठिकाणी रोप वे ची सुविधा असून हे रोप वे स्नो पॉईंट ला जोडतो.
सात शिखरे .
नैनिताल येथे सात शिखरे हे एक मुख्य आकर्षणाचे ठिकाणे आहेत. चीन शिखर,कीलवारी, लाहियाकांता, देव फाटा,डेरोथेसेट
जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान
जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान, हे एक वैभवशाली अभयारण्य आहे. त्यालाच जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जाते. या उद्यानांमध्ये हत्ती, अस्वल वाघ हरिण चितळ यासारखे वेगवेगळे पशुपक्षी पाहायला मिळतात.
5.Darjiling Hill Station।दार्जिलिंग.
 |
दार्जिलिंग |
दार्जिलिंग मधील पाहण्यासारखी ठिकाणे .
दार्जिलिंग मधील पाहण्यासारखे ठिकाण म्हणजे टायगर हिल होय.टायगर हिल ची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे 2590 मीटर आहे. सूर्यास्त पाहण्यासाठी हे स्थळ खूप प्रसिद्ध असून या ठिकाणावरून कांचनगंगा पर्वत शिखर पाहता येते.
या ठिकाणी खूप सुंदर देखावा दिसतो. बर्फाने आच्छादलेली पर्वतशिखरे खूप मनमोहक दिसून येतात.टॉय ट्रेन मार्गातील एक प्रेक्षणीय स्थळ बतासिया लूप आहे.
टॉय ट्रेन मार्गातील चढाव कमी करण्यासाठी ची निर्मिती करण्यात आली असून त्या ठिकाणी असलेली निसर्गाचे डोंगर-दऱ्या चे निरीक्षण करता येते.
दार्जिलिंग येथील हिमालय पर्वतारोहन संस्था जगप्रसिद्ध आहे. पर्वतारोहीना आपली कौशल्ये विकसित करण्यासाठी ही संस्था महत्त्वाची मानली जाते.
6.मुन्नार.
 |
मुन्नार |
मुन्नार मधील पाहण्यासारखे ठिकाणे.
मुन्नारला दक्षिण भारतातील काश्मीर असे संबोधले जाते. मुन्नार हे एक प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळ असून ते दक्षिण भारतात केरळ राज्यामध्ये आहे.मुन्नार हे एक हिल स्टेशन आहे. या ठिकाणी चहाचे मळे प्रसिद्ध व पाहण्यासारखी आहेत.
'बेस्ट प्लेस फॉर रोमांस'म्हणून मुन्नार पर्यटन स्थळाचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलेला आहे.मुन्नार येथे एराविकुलम नॅशनल पार्क आहे.मुन्नारमध्ये ट्रेकर्सचे आवडते ठिकाण अनामुडी शिखर असून त्या ठिकाणी अनेक ट्रेकर्स आवर्जून भेट देतात.
मुन्नारमध्ये मत्तूपेती धरण प्रसिद्ध असून ते पाहण्यासारखे आहे.मुन्नारमध्ये इको पॉईंट आहे हे एक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे.
टाटा टी मुझियम या ठिकाणाचे आकर्षण आहे. इत्यादी बरेच ठिकाणी पाहण्यासारखे असून मुन्नार मध्ये राहण्याची फिरण्याची सुविधा उपलब्ध आहे.
7.Manali Hill Station।मनाली.
 |
मनाली |
Manali Hill Station हे उत्तरेकडील राज्य हिमाचल प्रदेशच्या बियास नदीच्या खोऱ्यात समुद्रसपाटीपासून 2,050 मीटर उंचीवर आहे. हे त्याच्या जवळच्या कुल्लू जिल्ह्यासह लोकप्रिय संस्कृतीत कुल्लू-मनाली म्हणून ओळखले जाते. देशभरात हे प्रसिद्ध ठिकाण आहे. हे देशातील ट्रेकिंग, स्कीइंग आणि पॅराग्लायडिंगच्या सर्वोत्तम सेवांपैकी एक देते.
मनाली हे एक बर्फाच्छादित व नयनरम्य पर्वत शिखर असून,मनाली हिल स्टेशन म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे. या ठिकाणची हवा अतिशय थंड असून जगभरातील अनेक लोक फिरण्यासाठी याठिकाणी येतात.
मनाली मध्ये पाहण्यासारखे काय आहे .
मनाली मध्ये निळाशार जलाशय तसेच गवताचे मैदाने, हिरवीगार वनराई निसर्गाचे सौंदर्य पाहायला मिळते. तसेच मनाली मध्ये तुम्ही रोहतांग पास, हिंडीबा मंदिर,मॉल रोड, मलाना व्हिलेज, सोलांग व्हॅली चंद्रखणी इत्यादी ठिकाणे पाहू शकता.
8. Masuri Hill Station।मसुरी.
 |
मसूरी |
मसूरी मधील पाहण्यासारखी ठिकाणे.
मसूरी मध्ये वेगवेगळ्या डोंगररांगा आहेत. भटकंती करण्यासाठी खूप चांगले ठिकाण असून या ठिकाणी धबधबा, कंपनी गार्डन, मसूरी तलाव ही ठिकाणी बघण्यासारखे आहेत.त्या ठिकाणी रस्त्याची सोय उपलब्ध असून सर्व सेवा उपलब्ध आहेत.
एप्रिल ते जून हा काळ पर्यटनाचा समजला जातो.या ठिकाणी संतोषी माता मंदिर, भट्टा फॉल व कमिटी ऑफ कंपनी गार्डन हे सुध्दा पाहण्यासारखे ठिकाणी आहेत.
मसूरी भव्य हिमालयाचे नयनरम्य दृश्य पाहायला चांगले ठिकाण आहे.येथे आल्हाददायक वातावरण आहे. भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ फेब्रुवारी-नोव्हेंबर आहे परंतु पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
9. Srinagar Hill Station।श्रीनगर.
 |
श्रीनगर |
श्रीनगर मधील पाहण्यासारखे ठिकाणे.
श्रीनगर या शहरामध्ये चित्तथरारक नैसर्गिक दृश्ये आहेत,परंतु अनेक ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले हे शहर देशातील सुंदर ठिकाणांपैकी एक आहे.श्रीनगर मधील निसर्गरम्य हवामान हे पर्यटकांचे आकर्षण आहे.
श्रीनगर मध्ये निशांत बाग प्रसिद्ध आहे हा बाग मोगल काळातील आहे.तसेच हिंदूंचे पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून जगभर प्रसिद्ध असलेले अमरनाथ मंदिर श्रीनगर पासून जवळच आहे.
जामा मशीद ही याच ठीकणी आहे ही सर्वात जुनी आणि भव्य मशीद म्हणून ओळखली जाते.तसेच श्रीनगर मधी हरी पर्वत किल्ला व परी राजवाडा पाहण्यासारखे ऐतिहासिक ठिकाणे आहे.
10.Shimala Hill Station।शिमला.
 |
शिमला |
शिमला मधील पाहण्यासारखे ठिकाणे.
शिमला हे उटी आणि दार्जिलिंग सारखेच येथे युनेस्कोची जागतिक वारसा असलेली माउंटन ट्रेन देखील आहे,जी तुम्हाला दरीचे मंत्रमुग्ध करणारे दृश्य आणि मार्गाच्या विवध बोगद्यांमधून एक अद्भुत अनुभव देते.एकूणच हे भारतातील सर्वात लोकप्रिय हिल स्टेशन म्हणता येईल.
शिमला येथे सर्वात उंच जाखू हिल नावाची टेकडी आहे,तसेच त्या ठिकाणी 108 फुट उंच हनुमानाची मूर्ति आहे.नक्षीदार व कलाकुसरी झरोखे असलेले चर्च पाहण्यासाठी ठिकाण आहे.
समर हिल हे या ठिकाणी पाहू शकता.ज्या ठिकाणी महात्मा गांधी यांनी भेट दिली होती.या शिमला मध्ये कुंभार लोक विविध प्रकार भांडी बनवतात.
अशा प्रकारे आपण भारतातील सर्वाधिक प्रसिद्ध असलेले 10 पर्यटन।प्रेक्षणीय।निसर्गरम्य स्थळाविषयी मराठी माहिती घेतली आहे.वरील लेख प्राथमिक माहिती म्हणून वापरावी धन्यवाद.
नवीन नवीन पोस्ट्स मिळवण्यासाठी आमचा What's app group join करा.