इंडेक्स फंड म्हणजे काय?
इंडेक्स फंड |
भारतात दोन मुख्य Stock Exchange आहेत,बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज या मध्ये 6000 आणि त्या पेक्षाही जास्त कंपन्या आहेत आणि NSE मध्ये एकूण 1900 पेक्षा ही जास्त कंपन्या आहेत.
आता प्रत्येक वेळेला 6000आणि 1900 कंपन्यांचे Analysis करणे शक्य नाही.त्यामुळे इंडेक्स फंड ची निर्मिती झाली.सेन्सेक्स।Sensex हा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इंडेक्स आहे. आणि निफ्टि।Nifty हा नॅशनल स्टॉक एक्स्चेंज आहे जसे की कोणतीही पुस्तके घ्यायच्या आधी आपण त्या पुस्तकाच्या सुरुवातीला असलेली अनुक्रमणिका बघतो.
म्हणजे अनुक्रमणिकेवरुन आपल्यला पुस्तक कसे आहे,ते समजते अनुक्रमणिका ला इंग्लिश मध्ये इंडेक्स।index म्हणतात.पुस्तकाच्या बाबतीत आपण अनुक्रमणिका म्हणजे इंडेक्स.इंडेक्स वरून पुस्तक कसे आहे याचा अंदाज लावतो. शेअर मार्केटमध्ये सुद्धा आपण सेन्सेक्स आणि निफ्टी इंडेक्स वरून शेअर मार्केटचा-Stock market अंदाज लावतो.
सेन्सेक्स मध्ये BSE टॉप 30 कंपनी असतात आणि निफ्टी मध्ये NSE मधल्या टॉप 50 कंपनी असतात.सेन्सेक्स साठ हजारांचा टप्पा गाठला असे आपण जेव्हा म्हणतो.तेव्हा कुठल्या एका कंपनीच्या शेअरची किंमत साठ हजार होत नसते.तर सेन्सेक्स ची किंमत त्यामध्ये असणाऱ्या तीस कंपन्यांच्या कामगिरीवर अवलंबून असते.त्याचप्रमाणे निफ्टी ची किंमत किती त्यामध्ये असणाऱ्या 50 कंपन्यांच्या कामगिरीवर अवलंबून असते.
आता सेन्सेक्स आणि निफ्टी।Sensex and Nifty च्या अंडर अनेक इंडेक्स येतात.जसे की निफ्टी च्या अंडर बँक निफ्टी।Bank Nifty,निफ्टी आयटी।Nifty IT,निफ्टी नेक्स्ट फिफ्टी।Nifty Next Fifty,निफ्टी FMCG इत्यादी.बँक निफ्टी मध्ये सगळ्या बँकिंग कंपन्या येतात.
निफ्टी आय टी मध्ये सगळे आयटी कंपन्यांचा समावेश होतो.निफ्टी नेक्सट फिफ्टी मध्ये निफ्टी मधल्या 50 कंपन्या सोडून पुढच्या पन्नास कंपन्या येतात.मला वाटतं तुम्हाला इंडेक्स म्हणजे काय ते स्पष्टपणे समजले असेल.
इंडेक्स फंड म्हणजे काय मराठी माहिती.
आपण जे शेअर मार्केटमध्ये असलेले पाहिले अशा इंडेक्समध्ये जे फंड गुंतवणूक करतात त्यांना इंडेक्स फंड म्हणतात.इंडेक्स फंड हे एक प्रकारे Mutual Fund असतात.पण Mutual Fund पेक्षा त्यात फरक आहे काय फरक असतो ते आपण बघणार आहोत.
Mutual Fund मध्ये Fund Manager सतत Active असतात.त्यांना सतत शेअर मार्केट वर नजर ठेवावे लागते. शेअर मार्केट चा अभ्यास करावा लागतो आणि आपल्याला चांगले रिटर्न कसे मिळतील, याकडे लक्ष द्यावे लागते. शेअर मार्केट प्रमाणे गुंतवणुकीमध्ये बदल करावे लागतात.
मार्केट प्रमाणे गुंतवणुकीमध्ये बदल होतो.त्या कशा काम करतात त्यावर त्याची परफोर्म अवलंबून असतो,त्याला Active Fund असे म्हटले जाते.तसा इथे इंडेक्स फंड मध्ये बदल करता येत नाही.म्हणून इंडेक्स फंड ला Passive Fund सुद्धा म्हटले जाते.
Index Fund चा इतिहास पाहिला तर इंडेक्स फंड हा वाढतच गेलेला आहे.निफ्टी हा फंड 2003मध्ये 1000 इतका होता.त्याच निफ्टी ची किंमत 2019 मध्ये अठरा हजाराच्या वर गेली होती,आजच्या तारखेला निफ्टी सतरा हजाराच्या वर आहे.
म्हणजे एखाद्याने Index Fund मध्ये एक हजार रुपये लावले असते तर असते 17 हजार रुपये झाले असते.इंडेक्स मध्ये गुंतवणूक करायचे असल्यास वेगवेगळ्या प्रकारचे अँड्रॉइड ॲप उपलब्ध आहेत.
इंडेक्स फंड चे फायदे।Benefits of Index Fund.
सर्वात मोठा फायदा म्हणजे इंडेक्स फंड मध्ये सर्वात कमी चार्जेस लागतात,याला Expense Ratio असे .Large Cap Mutual Fund चा Expense Ratio आहे - 1.5 % पण ,इंडेक्स फंड चा Avg Expense Ratio आहे 0.2 % असा फरक असतो.म्हणजे 1.3%चा फरक पडतो.मोठ्या रक्कम मध्ये हा फरक खूप जास्त असतो.
याचा अर्थ असा नाही की Active Fund मध्ये गुंतवणूक करायची नाही.हे या ठिकाणी फक्त एक उदाहरण सांगितले आहे .इंटडेक्स फंड चा दुसरा फायदा म्हणजे ज्या लोकांना रिसर्च करण्यासाठी वेळ नाही त्यांनी लॉंग टर्म साठी इंडेक्स फंड मध्ये गुंतवणूक करावी.कारण लाँग टर्म मध्ये इंटेक्स फंड ने आतापर्यंत चांगला फायदा दिला आहे.