MHT-CET Exam: एमएचटी-सीईटी परीक्षा संभाव्‍य वेळापत्रक झाले जाहीर!

MHT-CET Exam


MHT-CET Exam: सर्वाधिक विद्यार्थिसंख्या असलेली MHT-CET Exam एप्रिल व मे महिन्‍यात दोन टप्प्‍यात घेतली जाणार असल्याचे समजत आहे. म्हणजेच एमएचटी-सीईटी परीक्षाचे संभाव्‍य वेळापत्रक जाहीर, झाले आहे.


एमएचटी-सीईटी परीक्षा अपडेट्स 



विविध व्‍यावसायिक अभ्यासक्रमांना शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये प्रवेशासाठी सीईटी परीक्षेच्‍या माध्यमातून प्रवेश दिले जाणार असून, या सीईटी परीक्षांचे संभाव्‍य वेळापत्रक राज्‍य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे जाहीर करण्यात आलेले आहे. त्यानुसार मार्च महिन्‍यापासून टप्प्‍याटप्प्‍याने विविध शिक्षणक्रमांच्‍या सीईटी परीक्षा होतील. सर्वाधिक विद्यार्थिसंख्या असलेली एमएचटी-सीईटी परीक्षा एप्रिल व मे महिन्‍यात दोन टप्प्‍यात घेतली जाण्याची शक्यता आहे.


विद्यार्थ्यांना परीक्षांची तयारी करता यावी, या उद्देशाने सीईटी सेलतर्फे सीईटी परीक्षांचे संभाव्‍य वेळापत्रक जाहीर करण्यात येत असते. इयत्ता बारावी आणि पदवी अभ्यासक्रमांच्‍या आधारे अनुक्रमे पदवी आणि पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतली जाते.



यापूर्वी करोना महामारीमुळे विस्कळित झालेले सीईटी परीक्षांचे वेळापत्रक शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून सुरळीत झाले आहे. यामुळे प्रवेशप्रक्रिया वेळेत पूर्ण करणेदेखील यंत्रणांना शक्‍य होत आहे. शैक्षणिक वर्ष 2023-24 च्‍या प्रवेशासाठी घेतल्‍या जाणाऱ्या सीईटी परीक्षांचे संभाव्‍य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

एमएचटी-सीईटी परीक्षा संभाव्‍य वेळापत्रक 

  • एलएलबी- (3 वर्षे) 11 ते 13 मार्च
  • बी.एड.- 15 ते 18 मार्च
  • एमबीए- 23 व 24 मार्च
  • एमसीए- 30 मार्च
  • बी. डिझाइन- 6 एप्रिल
  • एम. आर्क.- 7 एप्रिल
  • एमएचटी-सीईटी- 16 एप्रिल ते 2 मे
  • एलएलबी -(5 वर्षे) 7 व 8 मे
  • बी. एस्सी. (नर्सिंग) -9 व 10 मे
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने