विजयादशमी दसरा विषयावर मराठी निबंध

विजयादशमी दसरा विषयावर मराठी निबंध

विजयादशमी दसऱ्याच्या दिवसाचे महत्त्व.

Vijayadashami Dashara Nibandh Marathi : दसरा हा सण हिंदू धर्मातील एक मोठा सण असून,त्या सणाला खूप महत्व आहे. विजया दशमी दसरा हा सण कधी येतो तर विजया दशमी दसरा हा सण "अश्विन शुद्ध दशमीला" येतो.


Join : Whats App Channel


अश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून नऊ दिवस "नवरात्र" असते. त्यानंतर चा दहावा दिवस म्हणजेच विजयादशमी दसरा होय.या सणाला "विजयादशमी" असेही म्हणतात.


दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा.

 

या काव्याचे खूप महत्व गौरवलेली आहे.दसरा हा पराक्रमाचा आणि पौरुषत्वाचा सण आहे.विजया दशमी दसरा या सणाचे खास महत्त्व काय आहे? विजया दशमी दसरा म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय समजला जातो.विजयादशमी दसरा हा सण का साजरा केला जातो?



कारण याच दिवशी श्री राम यांनी रावणाचा वध केला होता.तसेच म्हैषासुर या राक्षसाचा सुद्धा देवीने वध केला होता.विजयादशमी म्हणजेच आश्विन शुद्ध दशमी हा दिवस दसरा म्हणून पाळला जातो. 



नऊ दिवस नवरात्र साजरी होते आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरा करण्यात येते. ज्ञानाची देवता मानल्या गेलेल्या सरस्वती देवीचे पूजन या दिवशी विशेषत्वाने केले जाते. महाराष्ट्रात परस्परांना दसऱ्याच्या दिवशी सोने म्हणून आपट्याची पाने देतात. 


दसर्‍याच्या दिवशी सीमोल्लंघन,शमीपूजन,सरस्वतीपूजन,अपराजितापूजन,शस्त्रपूजा केली जाते. सायंकाळी गावाची सीमा ओलांडून जायचे शमी किंवा आपट्याचे पूजन करायचे, तेथे अष्टदल काढून त्यावर अपराजितेची देवीची स्थापना करायची आणि तिला प्रार्थना करायची की मला विजयी करा. त्यानंतर त्यांनी शस्त्र पूजन करावयाचे . व्यापाऱ्यांनी व्यापारासाठी प्रयाण व विद्यार्थ्यांनी सरस्वती पूजन करायचे, अशी प्रथा आहे.


दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने देण्याचे महत्व:

यामागे एक कथा आहे,रघुराजाने मोठा यज्ञ करून सगळी संपत्ती दान करून टाकली.त्याच वेळी वरतंतू नावाचे ऋषींकडे अध्ययन करणाऱ्या उच्च नामक ब्राह्मणाला गुरुदक्षिणा म्हणून दान करण्यासाठी चौदा कोटी सुवर्ण मुद्रा हव्या होत्या . 


कौत्साने निष्कांचन झालेल्या रघु राजांकडे सुवर्णमुद्रांचा याचना केली. त्याला रिकाम्या हाताने पाठवणे योग्य नाही . म्हणून राजाने कुबेराला सुवर्णमुद्रांचा वर्षाव करायला सांगितला. 



त्या सुवर्णमुद्रा ज्या झाडावर पडल्ल्या ते ते झाड आपट्याचे होते. कौत्साने आपल्याला हव्या तेवढ्या सुवर्णमुद्रा घेतल्या आणि बाकी उरलेल्या आयोध्या वासियांना वाटून टाकल्या. 


तो दिवस दसऱ्याचा होता. म्हणूनच दसऱ्याला आपट्याची पाने आपण एकमेकांना सोने म्हणून देतो. 


दसऱ्याच्या दिवशी पूजा कशी करतात?


या दिवशी सकाळी लवकर उठावे.अंघोळ करावी.त्यानंतर या दिवशी चांगल्या कामाला सुरवात करण्याची प्रथा आहे म्हणजे हा दिवस साडेतीन मुहूर्तंपैकी एक असल्याने मोठ्या कामाची उदा.घराचा पाया खोदणे,दुकानाचे उद्घाटन करणे,नवीन वस्तू खरदी करणे इ.शुभ कार्य म्हणून सूरवात केले जाते. 



या दिवशी दाराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जातात.या दिवशी झेंडूच्या फुलांना विशेष महत्त्व आहे.पुजे साठी फुले बाजारातून आणले जातात.घरातील वेगवेगळ्या शस्त्राची किंवा आपण ज्या वस्तूचा दररोज वापर करतो, त्या वस्तूची पूजा केली जाते. प्रथम त्या वस्तू स्वच्छ धुवून घेतल्या जातात. नंतर कोरड्या करून ज्या ठिकाणी पूजा मांडायचे आहे, तेथे सर्व व्यवस्थित खाली आसन टाकून वरती त्या वस्तू ठेवल्या जातात. 


त्या वस्तूंना हळद-कुंकू अगरबत्ती दिवा तसेच आपट्याची पाने,झेंडूची फुले, वाहून त्याची पूजा केली जाते.मग शाळेतील मुले सरस्वतीचे पूजन करतात,म्हणजे वह्या, पाटी,दप्तर पूजतात. तसेच शेतकरी बांधव आपल्या घरातील कुदळ-फावडे, टिकाव वेगवेगळ्या शेतीच्या अवजारांची पूजा केली जाते. 



आपल्या घरामध्ये आपल्याकडे असणाऱ्या वाहनांची पुजा सुद्धा या दिवशी करतात. पूजेची वेळी संध्याकाळी किंवा काही ठिकाणी सकाळी केली जाते.काकडीचे काप करून नैवद्य दाखवतात.


Join : Whats App Channel


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने