SWAYAM Portal : शाळा आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी ! स्वयं पोर्टल च्या माध्यमातून इयत्ता नववी ते पदवीपर्यंत अभ्यासक्रम मोफत..

SWAYAM Portal : शाळा आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी ! स्वयं पोर्टल च्या माध्यमातून इयत्ता नववी ते पदवीपर्यंत अभ्यासक्रम मोफत..

SWAYAM Portal

SWAYAM Portal Courses : उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या SWAYAM Portal वर इयत्ता नववी ते पदवी अभ्यासक्रम ऑनलाइन कोर्सेस करता येणार असून सर्व कोर्सेस विनामूल्य असणार आहेत. यामध्ये आयआयएम बेंगलोर आणि इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ सारख्या विविध प्रतिष्ठित संस्था आणि विद्यापीठांमधील अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आलेला आहे.

Join Our Whats App Channel

देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांसोबत करार करून भारत सरकारने 2,100 हून अधिक विनामूल्य कोर्सेस उपलब्ध करून दिले आहेत. तसेच या कोर्सेसमध्ये इयत्ता नववी ते पदवीपर्यंतच्या अभ्यासक्रमांमधील वेगवेगळ्या कोर्सेसचा समावेश करण्यात आलेला आहे.


हे सुद्धा वाचा : जिल्हा परिषद भरती 2023 : राज्यातील जिल्हा परिषदेमधील (ZP Bharti 2023) विविध रिक्त पदांसाठी भरतीप्रकिया सुरु 

SWAYAM Portal Courses : कोर्सेस पूर्ण केल्याचे सर्टिफिकेट हवे असल्यास..

स्वयंम पोर्टल (SWAYAM Portal) हे मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या पुढाकाराने चालवले जात आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यापीठांना त्यांचे 40% अभ्यासक्रम ऑनलाईन करण्याची परवानगी दिलेली आहे. यात विद्यापीठे स्वयं पोर्टलचा वापर करू शकतात. यूजीसीच्या नियमानुसार विद्यार्थी विद्यापीठ आणि कॉलेजमधील अभ्यासक्रम करण्यासोबत पोर्टलवर स्वतः अभ्यास करू शकणार आहेत.


स्वयं पोर्टल वरून कोर्स पूर्ण करून मिळालेले गुण त्यांच्या पदवीमध्ये ग्राह्य धरली जाणारा असून, विशेष बाब म्हणजे विद्यार्थी पोर्टल वरच मोफत अभ्यास करू शकतात. यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. एखाद्या विद्यार्थ्याला कोर्स साठी सर्टिफिकेट हवे असेल तर एक हजार रुपये भरून दिलेल्या ठिकाणी परीक्षा द्यावी लागेल, नंतर विद्यार्थ्यांना या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर त्याचे सर्टिफिकेट मिळेल.


SWAYAM Portal काय आहे?

स्वयम पोर्टलची (SWAYAM Portal) सुरुवात फेब्रुवारी 2017 मध्ये भारत सरकारने सुरू केली. स्वयम् हा भारत सरकारने सुरू केलेला एक उपक्रम असून, या पोर्टलच्या माध्यमातून नववीच्या वर्गापासून थेट पदवी पर्यंतचे विद्यार्थी विविध अभ्यासक्रमात ऑनलाइन माध्यमातून मोफत शिकू शकतात. देशाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या पुढाकाराने स्वयं पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे.


स्वयंम पोर्टलच्या माध्यमातून विद्यार्थी तब्बल 2000 हून अधिक अभ्यासक्रम शिकू शकतात. यासाठी 1000 हून अधिक शिक्षकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

देशातील विविध संस्थांमधील नामांकित शिक्षकांच्या मदतीने हे कोर्स तयार करण्यात आलेले आहेत. त्यामुळे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी निर्माण करून देणे तसेच समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचा डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून सर्व घटकांना ज्ञान आणि अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात प्रवाहात सामील करून घेण्यासाठी स्वयंम पोर्टल उपक्रमाची सुरुवात करण्यात आलेली आहे.

स्वयं पोर्टल मध्ये अभ्यासक्रम हा व्हिडिओ लेक्चर तसेच वेगवेगळे वाचन साहित्य डाउनलोड साठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. प्रश्न उत्तरे व स्वयंमूल्यमापन करण्याची संधी तसेच वेगवेगळ्या प्रकारचे शंका निरसनासाठी ऑनलाईन फोरम तयार करण्यात आला आहे.

स्वयम उपक्रमात भारत सरकारसोबत सहभागी असणाऱ्या नऊ संस्था

1. स्वयं शिक्षणासाठी आणि आंतरराष्ट्रीय कोर्ससाठी :
AICTE -All India Council for Technical Education
2. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी :
NPTEL (National Program on Technology Enhanced Learning).
3. नॉन टेक्निकल पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स :
UGC (University Grants Commission).
4. पदवीपूर्व शिक्षणासाठी :
CEC (Consortium for Educational Communication).
5. शालेय शिक्षणासाठी:
NCERT (National Council of Educational Research and Training) .
6. शालेय शिक्षणासाठी:
NIOS (National Institute of Open Schooling) .
7. दूरस्थ विद्यार्थ्यांसाठी :
IGNOU (Indira Gandhi National Open University) .
8. मॅनेजमेंट विद्यार्थ्यांसाठी :
IIMB (Indian Institute of Management, Bangalore) .
9. शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी:
NITTTR (National Institute of Technical Teachers Training and Research) .

SWAYAM Portal Courses : (हे लक्षात ठेवा)

Humanities, Engineering, Technology, Law, Management, Agriculture इत्यादी विषयांचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.


त्यासाठी स्वयमच्या अधिकृत लिंकद्वारे तुम्हाला नोंदणी करता येईल.

नावनोंदणी प्रक्रियेचे दोन प्रकार आहेत. स्वयंम पोर्टल वर आधीच निश्चित कालावधीचे अभ्यासक्रम आणि इतर स्वयं-गती अभ्यासक्रम आहेत.

निश्चित मुदतीच्या अभ्यासक्रमांना अंतिम मुदत असते. आणि सेल्फ-पेस कोर्सेससाठी वेळ मर्यादा नाही.

कोर्ससाठी प्रमाणपत्र मिळवायचे असेल तर त्याची माहिती आधी द्यावी लागेल आणि नंतर ते यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर, विहित नियमांसह संबंधित संस्थेकडून प्रमाणपत्र दिले जाईल.

SWAYAM Portal वर असे करा रजिष्ट्रेशन :

  • स्वयंम च्या अधिकृत पोर्टलवर जाऊन रजिस्ट्रेशन वर क्लिक करा.
  • सर्व माहिती भरून रजिस्ट्रेशन पूर्ण करा.
  • तुमचा लॉगइन आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा.
  • तुमच्या पात्रता आणि आवडीनुसार कोर्सची निवड करा.
  • सर्टिफिकेट हवे असेल तर आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करा, नंतर ‘स्वयं’ अध्ययनाला सुरुवात करा.

तालिका उदाहरण
आमचे Whats App ग्रुप जॉईन करा येथे क्लिक करा
पदभरती,नोकरी जाहिरात क्लिक कर
सरकारी योजना क्लिक कर
वाचन मित्र क्लिक कर
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने