संत ज्ञानेश्वर महाराज: बालपण,जीवन परिचय, कार्य, काव्यरचना, समाधी.

संत ज्ञानेश्वर महाराज: बालपण,जीवन परिचय, कार्य, काव्यरचना, समाधी.

Sant Dnyaneshwar Maharaj Infrmation In Marathi : महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्राच्या माती मध्ये अनेक संतांनी जन्म घेतलेला आहे. या संतांनी महाराष्ट्रातीलच नाही, तर संपूर्ण देशातील लोकांना दिशा देण्याचे काम केले. आज या संत परंपरेतील महान संत संत ज्ञानेश्वर विषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. संत ज्ञानेश्वर हे तेराव्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी होते. भागवत संप्रदायाचे प्रवर्तक योगी व तत्त्वज्ञ होते.


संत ज्ञानेश्वर महाराज


  • नाव - ज्ञानेश्वर
  • ज्ञानेश्वरांचा जन्म -आपेगाव येथे अकराव्या शतकात मध्यरात्री श्रावण कृष्ण अष्टमी 1917 इसवी सन 1275 रोजी झाला. महाराष्ट्र
  • वडिलांचे नाव- विठ्ठलपंत कुलकर्णी
  • आईचे नाव - लक्ष्मीबाई
  • भाऊ -निवृत्ती हे ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू व सोपानदेव व मुक्ताबाई या त्यांच्या भावंडांनी जन्मात अनुक्रमे इ.स.1995 , इ.स.1999 व 1201 मध्ये झाला आंबेगाव हे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण जवळील गोदावरी नदीच्या काठावर वसलेले छोटेसे गाव आहे.
  • ज्ञानेश्वरांचे वडील - विठ्ठलपंत

हे मुळात विरक्त संन्यासी होते. विवाहित असताना त्यांनी संन्यास घेतला व ते काशीला गेले गुरूंना ते विवाहित असल्याचं समजल्यावर त्यांना पुन्हा माघारी पाठवले. त्याच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यावर विठ्ठलपंतांना चार आपत्ती झाली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई अशी त्यांची नावे होत.

संत ज्ञानेश्वर महाराजांविषयी थोडक्यात.


विठ्ठलपंत तीर्थयात्रा करत करत. आळंदी मुक्कामी येऊन स्थायिक झाले होते. त्या काळी संन्यासाची मुले म्हणून सर्व समाज या चौघा भावंडांची हेटाळणी करीत असे. गावाने त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकले. परित्यक्त ब्राह्मण म्हणून त्यांना काळ कंठावा लागला.

ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांची मुंज करण्याचे आळंदीच्या ब्राह्मणांनी नाकारले. त्यावर विठ्ठलपंतांनी उपाय काय असे धर्मशास्त्र यांना विचारले, त्यावर केवळ देहदंडाची शिक्षा आहे. असे त्या काळातील ब्राह्मणांनी सांगितले. मुले संस्कारांपासून वंचित राहू नये व त्यांचे भविष्यात भले व्हावे.

  

यासाठी विठ्ठलपंतांनी व रुक्मिणीबाई यांनी आत्महत्या करून देहांत आई-वडिलांच्या मृत्यूनंतर ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना लोकांकडून त्रास सहन करावा लागला आहे. त्यांना अन्न आणि पाणी यासारख्या मूलभूत गोष्टी नाकारण्यात आल्या.ज्ञानेश्वरांनी आपली विद्वत्ता सिद्ध केली.

संत ज्ञानेश्वरांनी अत्यंत रसाळ भाषेत शब्दरचना केली. भावार्थदीपिका अर्थात ईश्वरी भगवद्गीतेचे अनुवाद ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरांनी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला.

ज्ञानेश्वरांचे संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांचा मराठी संस्कृतीवर असलेला प्रभाव आजही अबाधित आहे. निवृत्तीनाथ हेच ज्ञानेश्वरांचे सद्गुरू होते. नेवासा क्षेत्रात आपल्या गुरूंच्या कृपाशीर्वादाने ज्ञानेश्वरी हा ग्रंथ त्यांनी लिहिला.

  

खरे पाहता ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली व सच्चिदानंद बाबा यांनी लिहिली या ग्रंथास ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका म्हणतात.मराठी वागमयाचे देशीकार लेणे आहे.ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत भाषेतील ज्ञान श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांनी "माझ्या मराठी परी अमृतातेही पैजा जिंके ऐसी अक्षरे मेळवीन" , कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, सांगणाऱ्या ज्ञानेश्वरीत सुमारे नऊ हजार ओव्या आहेत. हा ग्रंथ इसवी सन 1290 मध्ये लिहिला गेल्याचे मानले जाते. "जो जो वांछील तो ते लाहो" असे म्हणत.

  

अखिल विश्वाची जणू काळजी वाहणार्‍या संत ज्ञानेश्वरांना वारकरी संप्रदायासह सर्वच भक्त प्रेमाने "माऊली" असे म्हणतात. त्यांनी धर्मातील क्लिष्ट अवडंबरे काढून धर्माला कर्तव्याचा वेगळा अर्थ दिला वांग्मय निर्मिती बरोबरच त्यांनी अध्यात्मिक लोकशाहीचे बीज राहण्याचा यशस्वी प्रयत्न चंद्रभागेच्या वाळवंटात केला.

भागवत धर्माचा तथा वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याचे अभूतपूर्व कार्य संत ज्ञानेश्वरांनी केले. संत ज्ञानदेव, संत गोरा कुंभार, संत सावतामाळी या समकालीन संत प्रभावळीचे अनौपचारीक नेतृत्व करत, संत ज्ञानेश्वरांनी अध्यात्माच्या क्षेत्रात समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या काव्यरचना:


1.ज्ञानेश्वरी.

ज्ञानेश्वरी मध्ये एकूण 18 अध्याय आहेत. हा मराठीतील सर्वश्रेष्ट ग्रंथ आहे. इ .स.1290 मध्ये एका खांबाला टेकून भगवतगीतेवर आधारित भाष्य यात केलेले आहे. यालाच भावार्थदीपिका म्हणतात यामध्ये ब्रम्हविद्या,उपनिषद,योग शास्र,तसेच अध्यात्मज्ञान , व परमार्थ साधना हे ज्ञानेश्वरीतील मुख्य विषय या भावार्थदीपिका चे मुख्य तत्वज्ञान आहे.

2.अमृतानुभव.

हा ग्रंथ ज्ञानोत्तर भक्तीच्या भागवत धर्माच्या पायाभूत सिद्धांत साठी लिहाला ज्ञानेश्वरी लिहल्यानंतर हा ग्रंथ लिहाला आहे.

3.चांगदेव पासष्टी.

चांगदेव पासष्टी हा एक शिष्यसंवाद असून त्यात चांगदेव महाराज हे चांगदेव पासष्टी हा ज्ञानेश्वरांनी चांगदेवला केलेला उपदेश आसून त्यात 65 अभंग आहेत म्हणून त्याला चांगदेव पासष्टी असे म्हटले जाते.

4.हरिपाठाचे अभंग:


ज्ञानेश्वरांनी अनेक अभंग रचलेले आहेत त्यात हरिनामाचे महत्व संगीतलेले आहे.

  

वरीलप्रमाणे या त्यांच्या काव्य रचना आहे. अध्यात्म आणि तत्वज्ञान विषयक विचार मराठीतूनही व्यक्त करता येतात. असा विश्वास संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथ कर्तृत्वातून निर्माण केला.

त्यामुळे समाजातील सर्व थरातील लोकांना आध्यात्मिक लोकशाहीची प्रेरणा मिळाली. ज्ञानेश्वरांनी आपल्या काव्य रचना करताना रखुमाई वर, ज्ञाना ज्ञाना बाई, आणि ज्ञानदेव ही नावेही वापरले आहेत. ज्ञानेश्वरीच्या अखेरीस ज्ञानेश्वरांनी स्वतःची नाथ संप्रदायाची परंपरा सांगितलेली आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीता हा ग्रंथ मराठीतून लिहिला.

संत ज्ञानेश्वरांची संजीवन समाधी:

संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या 21 व्या वर्षी पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी कार्तिक वद्य त्रयोदशी ,शके 1218 इ.स. 1296 रोजी संजीवन समाधी घेतली. हा ज्ञान सूर्य मावळल्यानंतर अवघ्या वर्षभरात निवृत्ती सोपान व मुक्ताबाई या त्यांच्या भावंडांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली.


टिप-वरील महितीमध्ये काही चुकीचे आढल्यास खालील कमेंट बॉक्स मध्ये कृपया संपर्क करा.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने