सोप्या पद्धतीने मराठी निबंध लेखन करण्यासाठी आवश्यक माहिती

मराठी निबंध लेखन कसे करावे?

Marathi Nibandh Lekhan : आपण अगदी तिसरी ते चौथी पासून बारावीपर्यंत तसेच एमपीएससीच्या परीक्षा देण्यापर्यंत आपल्याला निबंध लेखन करावे लागते. निबंध लेखन शालेय जीवनामध्ये प्रत्येकाने केलेलेच असेल, निबंध लेखन म्हणजे काय या विषयी आपण आणखी जाणून घेऊया.



"निबंध म्हणजे नियमाने पद्धत असणारा उपाययोजनेसाठी अनुसरून अभिप्रेत लांबीचा, संक्षिप्त व्यवस्थित मांडलेला, विचारांनी परिपूर्ण असा मुद्देसूद लेख होय."

यालाच आपण निबंध असे म्हणू शकतो.

निबंधाची व्याख्या :


"एखाद्या विषयासंबंधी संगतवार रचलेले वा उभारलेले मध्यम व्याप्तीचे लेखन म्हणजे निबंध होय."

उत्कृष्ट निबंध लेखनासाठी आवश्यक गोष्टी 


1.निबंध लेखन करताना, लेखनाचे नियम व्यवस्थित आणि नियमानुसार लेखन करणे आवश्यक असते.

2.निबंध लेखनामध्ये व्याकरण हे खूप महत्त्वाचे असून तसेच अर्थपूर्ण लेखनाला खूप महत्त्व दिले जाते.

3.निबंधाचे वेगवेगळी परिच्छेद पाडून, त्यामध्ये सुरुवात त्यानंतर मध्य भाग तसेच अंत्य भाग यामध्ये विषयानुसार, आपल्या विचारानुसार लेखन केले जाते.

4.निबंध लिहिताना आपण वर्णणाचा एक स्थान आणि कथेचा कळस समाविष्ट करणे गरजेचे असते.

5.निबंधाचे वेगवेगळे प्रकार पडतात.

6.लेखकाने आपल्या विचारानुसार शब्दा द्वारे चित्र रंगवले पाहिजे तसेच वर्णन करण्यासाठी विशिष्ट अशी पद्धत वापरली पाहिजे जेणेकरून वाचकाच्या संवेदना जागृत होतील .

 

7.वर्णन करताना त्यामध्ये वाचकाला आवड निर्माण होणे आवश्यक आहे. त्यातील वेगवेगळ्या घटनांचा क्रम नुसार मांडणी लेखनातील वेगवेगळे कौशल्य मांडणे अपेक्षित असते.

8.परीक्षेत निबंध लिहीण्यासाठी वेगवेगळे पर्याय दिलेले असतात. त्यापैकी कुठल्या विषयाचे तुम्हाला जास्त ज्ञान आहे, तो विषय निवडणे फायद्याचे ठरते .

9.कोणत्या पॅरेग्राफ मध्ये कोणते मुद्दे लिहायचे आहेत हे अगोदरच नियोजन करून लिहिल्यास आपल्याला लिखन निबंध लिहिण्यात अडचण निर्माण होणार नाही आणि विषय भरकटणार नाही.

10.निबंध विषयाबद्दल तुम्हाला चांगल्याप्रकारे माहिती नसल्यास आपले प्रथम काम म्हणजे शक्य तितकी माहिती गोळा करणे. पुरेसे ज्ञान मिळवण्यासाठी त्यात काही वेळा लक्षपूर्वक वाचन करणे.

11.माहिती अचूकपणे समजण्यासाठी आपण आवंतर वाचन करणे आवश्यक आहे.


12.स्वतःला प्रश्न विचारा आणि त्याचे उत्तर द्या. आपल्याला काही परिच्छेदांमध्ये निबंध खंडित करण्याची आवश्यकता असते. अन्यथा निबंध वाचणे आणि समजणे कठीण वाटू शकते.

13.प्रत्येक परीक्षेत एक विशिष्ट कल्पना व्यक्त करेल असा असावा आपल्या वाचकांना असे वाटेल की आपण त्यांच्याशी बोलत आहोत .

14.हुशारीने निष्कर्ष काढा. आपण आपल्या निबंधात पुरेशी माहिती जोडणे आवश्यक आहे. त्यानंतर निष्कर्ष विभागात काही तर्कशास्त्र दर्शवा. खरंतर आपल्या निबंधातील निष्कर्ष भागावरच बरेच अवलंबून असते.

15.काळजीपूर्वक वाचणे यात काहीही चूक नसल्याचा आपल्याला विश्वास असायला लागते, की आपण काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

16.निबंध लेखनातून टप्प्याटप्प्याने तर्कसंगत मांडणीतून एखादा निर्णयापर्यंत का आणि कसे जायचे याचेही भान तुम्हाला यानिमित्ताने घ्यावे ही अपेक्षा असते.

17.विषय संबंधित एखादी कविता येत असेल किंवा सुविचार येत असेल, तर निबंध मध्ये लिहिणे हे फायद्याचे ठरते. त्यामुळे आपले लेखन उठावदार दिसते.

18.निबंधामध्ये उगाचच काहीतरी ओळी भरायच्या म्हणून लिहू नये.
निबंध लेखनाची अनेक प्रकार आहेत काही प्रकार पुढीलप्रमाणे.


निबंध लेखनाची प्रकार -


1.वाद-विवादात्मक निबंध-

या प्रकारात लेखकाचा दृष्टिकोनातून वाचन करणाऱ्याला आपले म्हणणे पटवून देणे अपेक्षित असते. युक्तिवादाच्या दोन्ही बाजूंनी या निबंधांमध्ये मानणे आवश्यक आहे. लेखकाच्या युक्तिवादाची वजन जास्त आहे हे वाचकाला समजणे किंवा पाठवून देणे महत्वाचे असते.

2.वर्णनात्मक निबंध -

लेखक यातून व्यक्ती, भावना, ठिकाण, अनुभव, वस्तू, परिस्थिती, आठवणी ,प्रवास यांचे वर्णन करू शकतो. वर्णनात्मक निबंध मध्ये फक्त नावापुरते वर्णन करतात. वर्णन शब्द आणि रंग आणि ते चित्र वाचकाला दिसणारे पाहिजे. माझा पहिला प्रवास, मला पडलेले स्वप्न, इ.

3.विवरणात्मक निबंध -

विवरणात्मक निबंध लेखक आपला विषय लेखणीच्या माध्यमातून मांडतो. तर त्याने योग्य उदाहरणे, पुरावा यांनी पटवून देतो. हा निबंध प्रकार थोडासा वर्णनात्मक निबंध त्याचा सारखा वाटेल,पण या प्रकरणातील सत्य आणि पुरावे द्यायचे असतात. यामध्ये लेखक आपल्या भावना दाखवू शकत नाही.

4.कथनात्मक निबंध -

कथनात्मक निबंध प्रकारांमध्ये निबंध लिहिणारा स्वतःच्या अनुभवातून काही गोष्टी समोर आपल्या लेखणीतून मांडत असतो. हा निबंध प्रकार लिहिण्यासाठी सोपा वाटतो. पण यात लिहिणाऱ्याला आपल्या अनुभवाबद्दल विचार करणे आवश्यक असते. त्याची मांडणी व्यवस्थित होणे गरजेचे असते .



योग्य वाक्यरचना आणि योग्य शब्दाचा वापर करून कथनात्मक निबंध लिहिणे गरजेचे असते. उदाहरणार्थ या निबंध प्रकारांमध्ये शाळेचा पहिला दिवस, पावसाळ्याचे दिवस, माझी आई, उन्हाळ्याची सुट्टी इत्यादी निबंध येतात.

5.प्रेरक निबंध -

प्रेरक निबंध प्रकारांमध्ये वाचन करणाऱ्याला तुमचा विषय मुद्दा पटवून द्यायचा असतो त्यामध्ये तर ती आणि पूर्वी जोडणे आवश्यक असते तसेच त्यातील मुद्दे च्या दोन्ही बाजू तुम्ही मांडू शकले पाहिजे आणि त्या पूर्ण क्षमतेने वाचकाला पटवून देणे आवश्यक असते थोडक्यात लिहिणाऱ्याला वाचणाऱ्याची मन वळवायचे असते उदाहरणार्थ जातीवाद आरक्षण जीएसटी वेगवेगळे सोशल मीडिया इत्यादी.

6.प्रदर्शनात्मक निबंध -

या मध्ये एखाद्या विषयाचा विजय स्टार्स अभ्यास सादर करणे अपेक्षित असते अशा प्रकारचे निबंध लिहीण्यासाठी लेखकाला त्या विषयाची सखोल आणि विस्तृत ज्ञान गरजेचे आहे या ठिकाणी विशिष्ट भावनांना वाव न देता वेगवेगळी उदाहरणे तत्त्य आकडेवारी यांच्या वर आधारित वर्णनात्मक निबंध लिहिणे अपेक्षित असते.

याव्यतिरिक्त आणखी काही निबंधाचे प्रकार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने