शिवनेरी किल्ल्याची संपूर्ण माहिती.


Shivneri Fort Information In MArathi : शिवनेरी किल्ला हा इतिहासातील अनेक किल्ल्यापैकी एक किल्ला असून हा किल्ला महाराष्ट्रातीलच नाही तर जगातील प्रसिद्ध किल्ला आहे. या किल्ल्याची संपूर्ण माहिती पुढीलप्रमाणे पाहूया.


शिवनेरी किल्ल्याची संपूर्ण माहिती.

  • किल्ल्याचे नाव - शिवनेरी
  • राज्य - महाराष्ट्र , भारत
  • जिल्हा - पुणे
  • शहर - जुन्नर (शिवनेरी किल्ल्यापासून 2 कि.मी.अंतर)
  • किल्ल्याचा प्रकार - गिरीदुर्ग
  • स्थापना - इ.स.1170 मध्ये झाले.
  • बांधकाम - यादव वंशाने केलेले आहे.
  • डोंगररांगा - नाणेघाट
  • किल्ल्याची ऊंची - 3500 फुट
  • सध्याची मालकी - भारत सरकार

शिवनेरी किल्ल्याचा इतिहास.

शिवनेरी किल्ला कुठे आहे तर शिवनेरी हा किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर या शहराजवळच आहे. पुणे शहरापासून एकशे पाच किलोमीटर आंतरावर शिवनेरी किल्ला आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक 26 मे 1909 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.


इ. स. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून त्याला जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत.


शिवनेरी या किल्ल्याचा आकार शंकराच्या पिंडीप्रमाणे आहे. हा किल्ला जुन्नर या गावांमधील असून जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरी या किल्ल्याचे दर्शन होते.किल्ला तसा फार मोठा नाही. परंतु 1671 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी डॉ. जॉन फ्रायर याने या किल्ल्याला भेट दिली होती. त्यामुळे त्याने आपल्या साधनग्रंथात शिवनेरी किल्ल्यावर हजार कुटुंबांना सात वर्षे पुरेल एवढी शिधासामुग्री आहे. असा उल्लेख केला आहे.


जीर्णनगर म्हणून जुन्नर हे गाव इसवीसनपूर्व काळापासून प्रसिद्ध आहे. शकराजा नहपानाची राजधानी होती. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा नाश केला आणि जुन्नर व येथील सर्व परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते.



नाणेघाट हा पुरातन व्यापारी मार्ग या मार्गावरून फार मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असे. या ठिकाणावर नजर ठेवण्यासाठी या मार्गावरील दुर्गांची निर्मीती करण्यात आली.सातवाहनांची सत्ता स्थिरावल्यानंतर त्यांनी येथे अनेक ठिकाणी लेणी खोदवून त्याचे कामकाज केले.


सातवाहनांनंतर चालुक्य व राष्ट्रकूट या राज्यांची सत्तेखाली शिवनेरी होता.इ.स. 1170 ते 1308 च्या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले.नंतर इ स वी सन 1443 मध्ये मलीक-उल- तुजार याने यादवांचा पराभव करून किल्ला सर केला. अशा प्रकारे किल्ला बहमनी राजवटीखाली आला. 1470 मध्ये मलीक उत्तुजार प्रतिनिधी मलिक मुहम्मद यांनी केलेल्या नाके बंद करून पुन्हा हा किल्ला सर केला.


इ.स.1446 मध्ये मलिक महमद च्या वडिलांच्या मृत्यूनंतर निजामशाहीची स्थापना झाली पुढे 1493 राजधानी गडावरून अहमदनगरला हलवण्यात आली.इसवी सन 1565 मध्ये सुलतान मूर्तीचा निजाम ने आपला भाऊ काशिम ला गडावर कैदेत ठेवलेले होते .


इसवीसन 1595 मध्ये किल्ला व जुन्नर प्रांत मालोजीराजे भोसले यांच्याकडे वर्चस्वाखाली आला. जिजाबाई यांचे वडील जाधवराव यांच्या मृत्यूनंतर जिजामाता गरोदर असताना शहाजी राजे यांनी त्यांना त्यांच्या 500 स्वार सोबत ठेवून रातोरात शिवनेरीला घेऊन गेले होते.



शिवनेरी गडावर श्रीभवानी शिवाई देवी ला जिजाऊने नवस केलेला होता. जर मला पहिला पुत्र झाला तर तुझें नांव ठेवीन. शिवाजीराजे यांचा जन्म झाला 19 फेब्रुवारी इसवी सन 1630 मध्ये त्यांचा शिवाजी महाराजांचे जन्म झाल्यानंतर 1632 मध्ये जिजाबाईंनी शिवाजी महाराजांसह गड सोडला आणि 1630 मध्ये किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला.


इ,स. 1665 मध्ये मोगलांविरुद्ध येथील महादेव कोळी यांनी बंड केले. यात मोगलांचा विजय झाला. पुढे इसवी सन 1673 मध्ये शिवनेरीचा किल्लेदार अजित खान याला फितरून किल्ल्याला माळ लावून सर करण्याचा यशस्वी प्रयत्न शिवाजी महाराजांनी केला गेला आणि मराठ्यांनी किल्ला घेण्याचा परत एकदा प्रयत्न केला. मात्र अपयश पदरात पडले.


पुढे तीस वर्षानंतर 1678 मध्ये जुन्नर प्रांत लुटला आणि मराठ्यांनी किल्ला परत एकदा घेण्यासाठी प्रयत्न केला मात्र अपयश पदरात पडले पुढे सतराशे सोळा मध्ये शाहू महाराजांनी किल्ला मराठी शहीद आणला व नंतर तो पेशव्यांकडे हस्तांतरित करण्यात आला.


शिवनेरी किल्ल्यावर जाण्यासाठी वाटा.

शिवनेरी किल्ला हा उंच डोंगरावर असल्याकारणाने गडावर जाण्याचे दोन प्रमुख वाटा आहेत. जुन्नर गावातून त्या किल्लेकडे जातात . शिवनेरी किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत .


1. सात दरवाज्यांची वाट.
शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून डाव्या बाजूने रस्त्याने चालत गेल्यावर डांबरी रस्त्याने आपण सरळ गडाच्या पायथ्याशी येऊन थांबतो. या वाटेने गेल्यावर गडावर जाताना सात दरवाजे लागतात त्यातील पहिला दरवाजा महा दरवाजा म्हणून ओळखला जातो.


दुसरा दरवाजा पीर दरवाजा म्हणून ओळखला जातो. तिसरा दरवाजा परवानगीचा दरवाजा, चौथा हत्ती दरवाजा, पाचवा शिपाई दरवाजा, सहावा फाटक दरवाजा आणि सातवा कुलाबकर दरवाजा अशा प्रकारे या सात दरवाजाचे सात दरवाजे ओलांडल्यानंतर किल्ल्यावर पोहचण्यासाठी आपल्याला साधारणत दीड ते दोन तास लागतात.


2. साखळीची वाट.
या वाटेने गडावर यायचे झाल्यास जुन्नर शहरात शिरल्यानंतर बस स्टँड समोरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास जवळील चौकात जावे लागते.त्या ठिकाणी डाव्या बाजूस पायवाट आहे त्या जाणाऱ्या रस्त्याने साधारणपने एक किलोमीटर गेल्यावर रस्त्याच्या उजव्या कडेला एक मंदिर लागते मंदिरासमोरून जाणारी पायवाट थेट शिवनेरी किल्ल्या जवळ एका कातळ भिंतीपाशी येऊन जाते.

  

भिंतीला लावलेल्या साखळीच्या आणि कातळात खोदलेल्या पायऱ्यांच्या साह्याने वर पोहचता येते. ही वाट थोडी अवघड आहे. तरी पोहोचण्यासाठी एक तास वेळ लागतो.


शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्माचा इतिहास.

पत्नी जिजाबाई गरोदर असताना शहाजी महाराजांनी आपल्या पत्नीला शिवनेरी किल्ल्यावर ठेवण्याचा विचार केला .कारण तो किल्ला भक्कम तटबंदी असलेला किल्ला होता.किल्ल्यात शिवाई देवीचे छोटे मंदिर होते.त्या ठिकाणी दर्शनाला जिजाबाई नियमित जात असत.



त्यावेळी त्यांनी देवीला नवस केला की तुझ्या नावावरून मी माझ्या मुलाचे नाव ठेवील.फक्त मला पुत्र प्राप्ती होऊ दे.तर तसेच झाले शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला.


शिवनेरी किल्ल्यावरील महत्वाची ठिकाणे .

1.शिवाई देवीचे मंदिर.
या गडाला सात दरवाजे आहेत. यातील पाचवा दरवाजा म्हणजे शिवाई देवीचा दरवाजा आहे .त्याला शिवाई दरवाजा असे म्हणतात. या दरवाजातून पुढे गेल्यावर उजव्या बाजूला शिवाई देवीचे मंदिर लागते या मंदिरात शिवाई देवीची सुंदर मुर्ती आहे. त्याच्या पाठीमागे दगडात कोरलेल्या लेण्या व गुहा आहे.


2.प्रवेशद्वार.
प्रवेशद्वार ज्याला आपण महाद्वार असे म्हणतो.जो पेशव्यांनी बांधलेला आहे. या दरवाज्याला बुरुंज आहेत आणि त्यावर चढण्यासाठी पायऱ्या आहेत. पूर्वीच्या काळी यावर चढून शत्रूवर नजर ठेवता येत होती. या ठिकाणी चढल्यावर आपल्याला आजूबाजूच्या निसर्गाचे दर्शन होते.



3.शिवाजी महाराजांचे जन्म घर
ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा जन्म झाला ते ठिकाण किंवा ती इमारत त्या ठिकाणी पाहायला मिळते. दोन मजले असून खालच्या मजल्यात शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता.


4.तानाजी मालुसरे व उद्यान.
गडाच्या डाव्या बाजूला तानाजी मालुसरे बद्दल पाहायला मिळते.


5.पाण्याचे झरे.
गडाच्या आतील बाजूला दोन नैसर्गिक झरे असून त्यांना गंगा यमुना या नावाने ओळखले जाते.


6.शिवकुंज.
या किल्ल्यात हे शिवछत्रपती व जिजाबाई यांची मूर्ती पाहायला मिळते.


7.अंबरखाना
सर्व दरवाजा पार केल्यावर अंबरखाना पाहायला मिळतो. याचा वापर पूर्वी धान्य साठवण्यासाठी करत असत.पाण्याचा तलाव किल्ल्यावर बदामी तलाव नावाने ओळखला जातो.


8.कडेलोट टोक .
बदामी तलाव याच्या थोडे पुढे गेले की कडेलोट टोक दिसते. याची उंची 1500 फूट आहे. याचा वापर पूर्वी गुन्हेगाराला शिक्षा देण्यासाठी केला जात होता.


9.लेण्याद्रीची लेणी .
शिवनेरी किल्ल्या पासून दोन किलोमीटर अंतरावर लेण्याद्री ची लेणी आहे .

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने