भारत सरकारची मिशन कर्मयोगी योजना जाणून घ्या संपूर्ण माहिती..
Mission Karmayogi Yojana : मिशन कर्मयोगी योजना (Mission Karmayogi Yojana) हा भारत सरकारने सुरू केलेला नोकरदार यंत्रणेला प्रशिक्षित आणि सक्षम बनविण्यासाठी नवीन उपक्रम आहे. ज्याचा उद्देश नोकरदार यंत्रणेला प्रशिक्षित आणि सक्षम बनविणे आहे. या Mission Karmayogi Yojana चे पहिले आणि महत्वाचे उद्दिष्ट म्हणजे भविष्यासाठी परिणामाभिमुख नागरी सेवा तयार करणे असून, सर्वसामान्य नागरिकांसाठी प्रभावी नागरी प्रशासन उभा करणे हा आहे.
सरकारी धोरणे नागरिकांच्या कल्याणासाठी असतात आणि सरकारी कार्यक्रमांच्या अंमलबजावणीमध्ये लोकसेवकांची भूमिका महत्त्वाची असते हे लक्षात आल्याने मिशन कर्मयोगीचे (Mission Karmayogi Yojana) महत्व लक्षात आले.
21 व्या शतकातील गतिशील व जटिल आव्हानांना प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी योग्य आवश्यक Skills, अपडेटेड असे ज्ञान आणि समर्पित वृत्तीने नागरी सेवकांना सक्षम बनवण्याचा प्रयत्न मिशन कर्मयोगी च्या माध्यमातून केले जाते.
Mission Karmayogi Yojana : मिशन कर्मयोगी योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये :
नागरी सेवेतील वेगवेगळ्या भूमिकांसाठी आवश्यक असलेली मुख्य कौशल्ये आणि क्षमता ओळखण्यासाठी सर्वसमावेशक सक्षमता Framework विकसित केले जाणार आहे. हे Framework सातत्याने दिले जाणारे Training program and its evaluation हे design करण्यासाठी सक्षम असा बेस तयार करु शकतो.
मिशन कर्मयोगी नागरी सेवेतील सेवकांना त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये सतत Learning and development opportunities उपलब्ध करून देणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवूनकाम करेल. ऑनलाइन कोर्सेस, ई-लर्निंग मॉड्यूल्स आणि कार्यक्षम अश्या लवचिक प्रशिक्षणासाठी Virtual classroom तयार करून Technology and digital platforms चा लाभ उपलब्ध करूनदेण्यात मदत करेल.
Mission Karmayogi Yojana :
वैयक्तिक विकास योजना।Personal Development Plan
नागरी सेवकांना त्यांची कामाची आणि सेवा देण्याची ताकद आणि कामात सुधारणेची क्षेत्रे ओळखण्यासाठी म्हणजे सेल्फ डेव्हलपमेंटसाठी तयार केले जाईल. त्यांचे हे प्रशिक्षण आणि त्यांच्या विशिष्ट नोकरीच्या गरजा आणि करिअरच्या गोल्सला पूर्ण करण्यात मदत करेल.
सहयोग आणि ज्ञानाची देवाणघेवाण।Collaboration and knowledge sharing:
Mission Karmayogi Yojana सरकार, शासकीय विभाग आणि सरकारी एजन्सीच्या विविध स्तरांमध्ये सहयोग आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्यास मदत करेल. नागरी सेवेची एकूण परिणामकारकता वाढवण्यासाठी सर्वोत्तम पद्धती, एकूण अनुभव आणि नाविन्यपूर्ण कल्पनांच्या देवाणघेवाणीला प्रोत्साहन देते.
कार्यप्रदर्शन व्यवस्थापन।Performance Management
मिशन कर्मयोगी वैयक्तिक आणि संस्थात्मक कार्यप्रदर्शनाशी प्रशिक्षण आणि क्षमता निर्माण जोडून कार्यप्रदर्शन-केंद्रित दृष्टिकोनावर जोर देते. उत्तरदायित्व आणि परिणामाभिमुख प्रशासनाची संस्कृती निर्माण करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.
मिशन कर्मयोगी योजनेची (Mission Karmayogi Yojana) अंमलबजावणी करून, भारत सरकार नागरी सेवेला व्यावसायिक, गतिमान आणि प्रतिसाद देणार्या कर्मचार्यांमध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न करते जे देशाच्या विकास आणि प्रगतीमध्ये प्रभावीपणे योगदान देऊ शकते.
नवीन नवीन पोस्ट्स मिळवण्यासाठी आमचा What's app group join करा.