Hutatma Din (हुतात्मा दिन) 30 January in Marathi.
हुतात्मा दिन हा भारतात वेगवेगळ्या तारखेला साजरा करतात. हुतात्मा दिनाला शहीद दिन असेही म्हणतात. म्हणजेच आपल्या देशासाठी ज्या व्यक्तींनी आपला जीव गमावला त्यांना आदरांजली वाहण्यासाठी हा हुतात्मा दिन साजरा केला जातो. हुतात्मा दिनाला इंग्रजीत Martyrs' Day असेही म्हणतात.
![]() |
30 जानेवारी हुतात्मा दिन |
30 जानेवारी हुतात्मा दिन म्हणून का साजरा करतात?
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्यासाठी देशभर 30 जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. कारण नथुराम गोंडसे या व्यक्तीने 30 जानेवारी 1948 मध्ये वयाच्या 78 व्या वर्षी महात्मा गांधीजी यांची गोळी घालून हत्या केली होती. म्हणून 30 जानेवारी हा दिवस भारतात हुतात्मा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. राष्ट्रीय स्तरावर सर्वोदय दिवस म्हणून या दिवसाची वेगळी ओळख आहे.
महात्मा गांधी यांची माहिती.
महात्मा गांधी यांचे नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. त्यांचे आईचे नाव पुतलीबाई होते. त्यांनी काही दिवस वकिली केली नंतर भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अहिंसा आणि सत्याच्या मार्गाने देशव्यापी चळवळ उभारली. महात्मा गांधीजी यांना लोकांनी राष्ट्रपिता हि पदवी बहाल केली होती.
महात्मा गांधी हे भारतीय स्वातंत्र्य मिळण्यासाठी एक महत्वाचे नेते होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते होते आणि त्यांना भारतातील राष्ट्रपिता मानले जाते. ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख व्यक्तिमत्त्व होते आणि त्यांनी विविध सामाजिक कारणांसाठी स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी देशव्यापी मोहिमांचे नेतृत्व केले.
महात्मा गांधी हे अध्यात्मिक नेते होते आणि त्यांनी अहिंसा, सविनय कायदेभंग आणि शांततापूर्ण निषेधाचे समर्थन केले होते. त्याच्या शिकवणी आणि तत्त्वे, विशेषत: अहिंसा आणि सविनय कायदेभंग, जगभरातील राजकीय आणि सामाजिक चळवळींवर प्रभाव टाकत आहेत. 1948 मध्ये एका हिंदू राष्ट्रवादीने त्यांची हत्या केली होती.
नवीन नवीन पोस्ट्स मिळवण्यासाठी आमचा What's app group join करा.