महात्मा गांधी: जीवन परिचय, बालपण, कार्य, प्रेरणादायी विचार.

All information of Mahatma Gandhi in Marathi।महात्मा गांधी मराठी निबंध

महात्मा गांधी यांचे बालपण:

सत्य व अहिंसा वर प्रेम करणारे महात्मा गांधी अशी त्यांची वेगळी ओळख आहे.त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक विषयांवर आपले विचार मांडले आहेत. 


महात्मा गांधीजी यांचे वडील वडील करमचंद हे पोरबंदर संस्थानाचे दिवाण होते.महात्मा गांधी याची आई पुतळीबाई अतिशय धार्मिक वृत्तीच्या होत्या.बालपणी महात्मा गांधींना काही वाईट मुलांची संगत लागली,परंतु त्यांना अल्पावधीतच आपल्या वागण्याचा पश्चाताप झाला.


वडिलांनी आणलेले पितृ भक्तीचे नाटक एकाग्रतेने वाचले आणि राजा हरिश्चंद्र यांचे नाटक पाहिले.हरिश्चंद्र यांचे यांच्या सत्य पालनाचा त्यांच्या मनावर फार मोठा परिणाम झालेला दिसून येतो.हरिश्चंद्र सारखे आपणही सत्यवादी व्हावे असे त्यांना वाटू लागले.


लहानपणी त्यांना भुताची भीती वाटत असे,त्यावेळी आईने त्यांना राम नामाचा जप करण्यास सांगितले.पुढील जीवनात त्यांना त्याचा फार उपयोग झाला.तसेच तुळशी रामायणाच्या वाचनाने ईश्वर भक्तीची ज्योत त्यांच्या रूदयात प्रज्वलित झाली.वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी त्यांचा विवाह कस्तुरबा यांची झाला.


इ.स.1885 मध्ये त्यांचे वडीलांचे निधन झाले आणि दोन वर्षानंतर ते मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले.त्यांच्या वडील भावाने त्यांना बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला पाठवण्याचे ठरवले.

परंतु यासाठी गांधीजीचा आईची परवानगी नव्हती.मात्र महात्मा गांधींनी मी अमली पदार्थाचे सेवन करणार नाही,अभक्ष्य भक्षण करणार नाही.परस्त्रीला स्पर्श करणार नाही.असे आईला वचन देऊन ते इंग्लंडला गेले.1891 साली महात्माजी बॅरिस्टर पदवी घेऊन भारतात आले.

Join : Whats App Channel

महात्मा गांधी यांचे कार्य:

महात्मा गांधी यांनी आपले संपूर्ण आयुष्यभर सत्याचे पालन केले आणि जगाला सत्याच्या मार्गावर चालण्याचा संदेश दिला.महात्मा गांधीजींनी बॅरिस्टर पदवी घेऊन भारतात आल्यावर मुंबई येथे वकिलीचा व्यवसाय सुरू केला,मात्र त्यांना वकिलीच्या व्यवसायात फारसे यश आले नाही.

अतिशय बुद्धिमत्ता असलेल्या गांधीजींना दक्षिण आफ्रिकेतील एक कृष्णवर्णीय व्यापार्‍यांनी आपला दावा चालवण्यासाठी एक वर्षाच्या कालावधीसाठी दक्षिण आफ्रिकेला नेले. 

अत्यंत कौशल्याने महात्माजींनी कृष्णवर्णीय व्यापार्‍याला न्याय मिळवून दिला.दक्षिण आफ्रिकेतील एका वर्षाच्या कालावधीत महात्मा गांधीजींना प्रस्थापित शासनाच्या अन्यायकारक जुलमी धोरणांची माहिती झाली.कृष्णवर्णीयांना न्याय मिळावा या उद्देशाने महात्मा गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांना संघटित केले.

प्रस्थापित शासनाच्या विरोधात सत्याग्रह केला.गौरवर्णीय प्रमाणे कृष्णवर्णीयांना वागणूक मिळावी,यासाठी महात्माजींनी जे कार्य केले ते सुवर्णाक्षरात करण्यासारखे आहे.गांधीजीनी बुद्धचरित्र आणि भगवतगीता वाचली गीतेचे सखोल चिंतन केले व त्यातील विचारांचा त्यांच्यावर सखोल परिणाम झाला. 

महात्मा गांधींना टॉलस्टॉयची वैकुंठ माझ्या हृदयात आहे.नावाचे पुस्तक वाचले.रस्किन चे सर्वोदय हे पुस्तक जाणून घेतले.सर्वांच्या कल्याणात आपले कल्याण सामावलेले आहे,याची त्यांना जाणीव झाली व उद्देश शिक्षणापेक्षा त्यांनी हृदयाच्या शिक्षणाला म्हणजेच चारित्र्याच्या विकासाला प्रथम स्थान दिलेले आपल्याला दिसून येते. 

महात्मा गांधींना सत्य आणि अहिंसेचा मार्ग अधिक श्रेष्ठ वाटत होता,त्यात मध्ये प्रचंड सामर्थ्य आहे, याची त्यांना जाणीव होती.त्यांची राहणी साधी होती,पण विचारसरणी उच्च होती.त्यांना फिरोज शहा मेहता हिमालयासारखे वाटत होते.लोकमान्य टिळक समुद्रासारखी व नामदार गोखले गंगे सारखे वाटत. 

भारतात मजुरांवर होणारा अन्याय त्यांनी पहिला व त्यांनी दूर केला.सत्याग्रह,सविनय कायदेभंग,शस्राशिवाय प्रतिकार,असहकाराच्या नवीन साधनांचा पुरस्कार केला.देशातील विषमतेची दरी दूर करण्याच्या उद्देशाने विश्वस्त सिद्धांत मांडला.हिंदू-मुसलमान यांच्यातील संबंध चांगले राहावे म्हणून त्यांनी प्रयत्न केले.

जातिभेद हे त्यांना मान्य नव्हता.त्यासाठी त्यांनी अनेक उपोषणे केली.अस्पृश्यांना हरिजन असे नाव दिले.हे सर्व कार्य ते निस्वार्थी बुद्धीने करीत होते.गीतेतील निष्काम कर्मयोग हे ते आचरनात होते.जनतेने त्यांना महात्मा ही उपाधी दिली. राष्ट्रपिता म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले.

महात्मा गांधी यांनी 1920 मध्ये काँग्रेसचे नेतृत्व चे सूत्रे हाती घेतली.महात्मा गांधीजींचे कार्य पाहून स्वातंत्र्यासाठी सारी जनता त्यांच्या मागे उभी राहिली.1942 चले जाव आंदोलन,भारत छोडो आंदोलन असे इंग्रजांना त्याने ठणकावून सांगितले. भारतीय जनता आता जागृत झाली होती.

Join : Whats App Channel

इंग्रजांनी लाठीमार,गोळीबार केला अनेकांना तुरुंगात घातले.पण इंग्रजांचे काहीही चालले नाही.1947 ला भारत देश स्वतंत्र झाला.भारताची फाळणी झाली.भारताची फाळणी अनेक लोकांना योग्य वाटली.

परिणामी एका तरुणाने दिल्लीत गांधीजींना प्रार्थना करत असताना 30 जानेवारी 1948 साली गोळी मारून ठार केले.गांधीजीच्या मुखात त्यावेळी हे राम! हे शब्द होते.महात्मा गांधींना हुतात्म्यांचे मरण आले.


सत्य व अहिंसा आणि सत्याग्रह या त्रिसूत्रीचा पुरस्कार करणाऱ्या महात्मा गांधींना 19 व्या शतकातील एक महामानव साऱ्या जगाने मानले.त्यामुळेच महात्मा गांधीजी यांचा जन्म 2 ऑक्टोबर हा दिवस भारतात गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा करण्यात येतो.


महात्मा गांधी यांनी असहकार,अहिंसा आणि शांततामय विरोध यांना शस्त्र म्हणून इंग्रजांविरुद्ध वापरले.त्यांनी सत्याग्रह केला,तुरुंगवास भोगला,आंदोलने केली आणि शेवटी इंग्रजांना भारत सोडण्यास भाग पाडले.   


महात्मा गांधी यांचे प्रेरणादायी विचार.

"तुम्हाला आनंद तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही जे विचार करता तुम्ही जे म्हणता आणि तुम्ही जे करता.ते सुसंगतपणे असेल."

"आपण आपल्या माणसांना गमावले शिवाय आपल्यासाठी कोण महत्त्वाचे आहे ते आपल्याला समजत नाही."  
"अहिंसा मानवतेसाठी सर्वात मोठी शक्ती आहे,ती मनुष्याने तयार केलेल्या शक्तिशाली शस्त्रापेक्षा अधिक शक्तिशाली आहे."
"एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवणे परंतु ज्या गोष्टी बरोबर नाही जगणे तिचा अनुभव घेणे हे अप्रामाणिकपणा आहे."
"इतरांना संतुष्ट करण्यासाठी किंवा समस्येपासून मुक्त होण्यासाठी हो म्हणण्यापेक्षा पूर्ण खात्री सह नाही म्हणणे चांगले आहे."
"ज्या दिवसापासून स्त्रिया सुरक्षित पणे रात्री रस्त्यावर चालू शकतील,त्या दिवसापासून आपण असे म्हणू शकतो की भारताने खर्‍या अर्थाने स्वातंत्र्य मिळवले आहे."
"मित्रांशी मैत्री करणे सोपे आहे, पण तुम्ही ज्याला शत्रू समजता, त्याच्याशी मैत्री करणे म्हणजे खऱ्या धर्माचे सार आहे."


"आपल्या कामाचा परिणाम काय होईल,आपल्याला कधीच माहीत नसते,परंतु आपण काहीही केले नाही, तर  निकालच लागणार नाही."
"सभ्य घरासारखी छान शाळा आणि चांगले पालकांसारखा चांगले शिक्षक नाही."
"आपण अडखळतो आणि पडतो पण आपण पडतो,संकटांपासून पळून जाण्यापेक्षा हे बरेच चांगले आहे."
"सोन्या-चांदीचे तुकडे नव्हे,तर आरोग्य हीच संपत्ती आहे,कारण मी हे वाया घालवण्यासाठी नाही तर ते विकारांवर विजय मिळवण्यासाठी मिळालेले आहे."
"स्वतःवर प्रभुत्व असल्याशिवाय इतर सर्वांवर प्रभुत्व गाजवणे हे ब्रह्माचे व निराश करणारे असते."
"राष्ट्रातील प्रत्येक घर हे शाळा आहे आणि घरातील माता-पिता हे शिक्षक आहेत."
"माझ्या परवानगीशिवाय मला कोणीही दुखावू शकत नाही."
"मनाला योग्य विचारांची सवय लागली की अयोग्य कृती आपोआप घडते."
" जे प्रेमाने मिळते ते कायम टिकून राहते"
" जग बदलायचे असेल तर आधीच स्वतःला बदला."
"खराब अक्षर की अर्धवट शिक्षणाची निशानी आहेत."
"कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला तरी,संयम पाळणे हेच शौर्याचे लक्षण आहे." 
"आपण एखादे काम हाती घेतले तर आपले अंतकरण त्यात ओतावे, पण त्याचे फळ ईश्वरावर सोपवावे."
"डोळ्याच्या बदल्या डोळा या तत्त्वज्ञानाने संपूर्ण जग आंधळे होईल." 
"भविष्यात काय घडेल परत याबद्दल विचार करायचा नाही, मला वर्तमानाची काळजी आहे."
"येणाऱ्या क्षणांवर देवाने मला काही नियंत्रण दिले नाही."


"चूक करणे हे पाप आहे, परंतु चूक लपवणे हे त्याहीपेक्षा मोठ पाप आहे."
"गुलाबाला उपदेश करण्याची गरज नाही तो तर त्याचा आनंद पसरवतो,त्याचा सुगंध त्याचा संदेश आहे."
"जे आपल्याला जमत असेल ते काम दुसऱ्यांकडून करून घेऊ नका."
 "प्रेमाची शक्ती दंडाच्या शक्तीपेक्षा हजार पटीने प्रभावशाली आहे."
 "आपले मत आपले विचार बनतात आपले विचार आपले शब्द होतात आपले शब्द आपले कार्य होतात आपले कार्य आपली सवय जडते ती सवय आपले आपले भाग्य बनते."
"पृथ्वी सर्वांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी संसाधने प्रदान करते,परंतु मनुष्याची लोकांची इच्छा पूर्ण करू शकत नाही."
"प्रेम हेजगातील सर्वात मोठी शक्ती आहे आणि आपण त्याची कल्पना करू शकतो."
"स्वतःला जाणून घेण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे इतरांच्या सेवेमध्ये स्वतःला झोकून देणे."
"साथ भयंकर पाप -1.विवेका शिवाय आनंद 2.मानवते विना विज्ञान 3.चरित्र विना ज्ञान 4.सिद्धांत रहित राजकारण 5.नैतिकता शिवाय व्यापार6. त्यागाशिवाय पूजा.7.कामाशिवाय पैसे."
"असे जगा की, तुम्ही उद्या मरणार आहात."
"अशा प्रकारे शिका की, तुम्ही कायमच जगणार आहात."
"माझे जीवन माझा संदेश आहे." 


"आपली चूक स्वीकारणे म्हणजे करता कचरा काढण्यासारखे सारखे आहे कचरा काढल्यावर जमीन साफ होते आणि चमकते."
"सत्य म्हणजे मोठा वृक्ष आहे,जोपर्यंत त्याची सेवा केली जाते,तोपर्यंत त्यावर अनेक फळे येत राहतात,ते कधीच संपत नाहीत."
"व्यक्तीची ओळख त्याच्या कपड्यांवरून नाही त्याच्या चारित्र वरून केली जाते."
 "जे वेळ वाचवतात ते पैसे वाचतात आणि जतन केलेली संपत्ती कमावलेल्या रकमेचा बरोबरीची असते." 
"विश्वास एक गुण आहे,अविश्वास दुर्बलतेची जननी आहे."
"बलवान व्यक्ती कोणालाही क्षमा करु शकत नाही,बलवान माणूसच क्षमा करू शकतो."
(वरील लेखात काही बदल असल्यास आमच्याशी कमेंट करा आणि संपर्क करा.)

आमचा व्हॉट्स ॲप चॅनल फॉलो करा!

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने