MSCE 5th-8th Scholarship Exam 2024 : महाराष्ट्र राज्य परीक्षेच्या वतीने इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा बाबत ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी अधिसूचना जारी केली असून, इयत्ता पाचवी आठवी शिष्यवृत्ती परीक्षा 18 फेब्रुवारी रोजी होणार आहे. अधिक माहिती पुढील प्रमाणे.
पाचवी - आठवी शिष्यवृत्ती परीक्षा 2024 ऑनलाइन फॉर्म सुरु
दरवर्षी इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी नऊ ते दहा लाख विद्यार्थी प्रविष्ट होतात. या शैक्षणिक वर्षात होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्र होणे शाळांचा स्कॉलरशिप परीक्षेचा निकाल वाढवणे, त्याचबरोबर विद्यार्थी निश्चित करून त्यांचे आवेदन पत्र भरणे, तसेच अभ्यासक्रम पूर्ण करणे याविषयी पूर्वतयारी करण्यात आली आहे.
आवेदन पत्र भरण्याची सुविधा
स्कॉलरशिप परीक्षा 2024 साठी परीक्षा परिषदेच्या वतीने शाळांना ऑनलाइन आवेदन पत्र भरण्याकरता एक जुलै 2023 पासून सुविधा देण्यात येणार होती, परंतु ते तांत्रिक कारणामुळे शक्य झाले नाही. दिनांक 1 जुलै ऐवजी 1 सप्टेंबर 2023 पासून शाळांना आवेदन पत्र भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
स्कॉलरशिप परीक्षा 2024 ऑनलाइन फॉर्म
लिंकस्कॉलरशिप परीक्षा 2024 फॉर्म भरण्यासाठी कालावधी
ऑनलाइन आवेदन पत्र भरण्याबाबत वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.
विद्यार्थी शुल्क सेस फंडातून भरणे
विद्यार्थी शुल्क सेस फंडातून भरणे, या परिपत्रकात दुसरी महत्त्वाची सूचना अशी देण्यात आली आहे, की इयत्ता पाचवी आठवी मध्ये शिकणाऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या परीक्षेला बसता याव म्हणून सर्व पात्र व प्रविष्ट होणारे विद्यार्थ्यांचे शुल्क जिल्हा परिषदेचे सेस फंडातून किंवा महानगरपालिकेचे निधीतून अदा केल्यास जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना परीक्षेला बसतील आणि त्यांना शिष्यवृत्ती परीक्षेची संधी मिळेल.