6 जानेवारी: जागतिक पत्रकार दिन।आद्य पत्रकार बाळशास्री जांभेकर यांची जयंती.

आद्य पत्रकार बाळशास्री जांभेकर यांची जयंती।6 जानेवारी जागतिक पत्रकार दिन.

बाळशास्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाने 6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केलेले आहे.


6 जानेवारी: जागतिक पत्रकार दिन.
जागतिक पत्रकार दिन

Table Of Content:

Table Of Content(toc)

बाळशास्री जांभेकर यांना मराठी वृत्त पत्राचे जनक म्हणून महाराष्ट्रातील आद्य पत्रकार बाळशास्री जांभेकर यांची जयंती 6 जानेवारी ला दरवर्षी जागतिक पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.


बाळशास्री जांभेकर यांनी मराठीतील दर्पण हे पहिले वृत्तपत्र 6 जानेवारी रोजी सुरु केले होते. याच दिवशी बाळशास्री जांभेकर यांचे स्मरण म्हणून त्यांच्या कार्याचा आढावा घेतला जातो. त्यांनी 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण वृत्तपत्र सुरु केले होते. जुलै 1840 मध्ये दर्पण चा शेवटचा अंक प्रकाशित झाला होता.


भारतावर इग्रजांचे राज्य होते त्यावेळी दर्पण या वृत्तपत्राने समजात जाणीव आणि जागृती निर्माण करण्याचे आणि भारतीयांचे मनोबल वाढवण्याचे काम केले. ब्रिटीश राजवटीच्या काळात भारतात वृत्तपत्र चालवणे खूप कठीण काम होते. 


आजही आपण स्वातंत्र्यात जीवन जगताना समाजात जाणीव व जागृती निर्माण करण्याचे काम वेगवेगळ्या वृत्तपत्राचे पत्रकार बंधू भगिनी करत आहेत. पत्रकार हे सर्व सामान्य जनतेचा आवाज शासन दरबारी पोहचवण्यासाठी मदत करत आहेत.


जागतिक पत्रकार दिन हा पत्रकारांची समाजातील महत्त्वाची भूमिका ओळखण्याचा आणि साजरा करण्याचा दिवस आहे. महत्त्वाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आणि सत्तेत असलेल्यांना जबाबदार धरण्यासाठी पत्रकार करत असलेले महत्त्वपूर्ण कार्य अधोरेखित करण्याची ही एक संधी आहे. 


पत्रकारांना त्यांचे कार्य पार पाडताना कोणत्या आव्हानांना आणि धोक्यांचा सामना करावा लागतो यावर चिंतन करण्याची आणि जगभरातील पत्रकारांच्या स्वातंत्र्याचे आणि पत्रकारांच्या संरक्षणाचे महत्त्व पटवून देण्याची ही वेळ आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने